कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातला वाद चिघळला,आंदोलकांची तीव्र निदर्शनं

ज्या पुजाऱ्यांनी देवीला घागरा चोळी नेसवली तेच पुजारी मंदिरात येत असल्यामुळं कोल्हापूरमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आता प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलाय.

Sonali Deshpande | Updated On: Aug 6, 2017 01:58 PM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातला वाद चिघळला,आंदोलकांची तीव्र निदर्शनं

संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 06 आॅगस्ट : करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरातला वाद आता पुन्हा एकदा उफाळलाय. ज्या पुजाऱ्यांनी देवीला घागरा चोळी नेसवली तेच पुजारी मंदिरात येत असल्यामुळं कोल्हापूरमध्ये आंदोलनकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आता प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिलाय.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या आई अंबाबाईला अजित ठाणेकर आणि बाबूराव ठाणेकर या दोघा पुजाऱ्यांनी घागरा चोळी नेसवली होती. त्यानंतर कोल्हापूरमध्ये पुजारी हटाव आंदोलन सुरु झालं. आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीतल्या एका बैठकीतच अजित ठाणेकर यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर निर्णय होईपर्यंत या दोघांनाही मंदिरात बंदी घालण्यात आली होती. तरीही बाबूराव ठाणेकर हे मंदिरात आल्यानं आंदोलनकर्ते आक्रमक झाले आहेत.

आज त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर तीव्र निदर्शन केली. आणि पुजाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर पोलिसांना निवेदनही देण्यात आलं. पण हे शेवटचं निवेदन असून यापुढं ठाणेकर पुजारी मंदिरात आले आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला दिलाय. सध्या हे प्रकरण न्यायालयात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असून पुजारी हटाव आंदोलन कधी मिटणार, त्याबाबत प्रशासन निर्णय कधी घेणार याकडे देवीच्या भक्तांचं आणि कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2017 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close