कोल्हापूरमध्ये धबधब्याच्या प्रवाहात 1 जण गेला वाहून

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यच्या उखळु धबधबा (म्हातारकडा ) पाहण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांपैकी एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2017 08:28 PM IST

कोल्हापूरमध्ये धबधब्याच्या प्रवाहात 1 जण गेला वाहून

संदीप राजगोळकर, कोल्हापूर

18 जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यच्या उखळु धबधबा  (म्हातारकडा ) पाहण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांपैकी एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय. खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर( वय35) असं वाहून गेलेल्या युवकाचं नाव आहे.

आज संध्याकाळी खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर, मेहबूब बाबासाहेब फकीर , दिलीप सदाशिव नगारे, राजेंद्र  बाबूराव शेळके, प्रदीप रघुनाथ माळी हे  सर्व राहणार बागणी तालुका वाळवा, अशोक माळी हे उखळु, शाहुवाडी येथील निसर्गरम्य धबधबा पहायला गेले होते. त्यातील पाच जण पाण्याच्या प्रवाहात उतरले असता पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यानं पाण्याचा अंदाज न आल्याने खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर हा प्रवाबरोबर वाहून गेला.

त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना बाकीचे पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना  डोहात दगडाचा आणि झाडांच्या फांद्या पकडून बसले होते. यामध्ये खुदबुद्दीनचा भाऊ मेहबूब फकीर जखमी झालाय.  स्थानिक नागरिकांनी त्यातील 4 युवकांना अथक परिश्रम करून पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात यश मिळवलंय पण एक युवक अजूनही बेपत्ता आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2017 08:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...