S M L
Football World Cup 2018

असा वापरा आधार कार्डचा 'व्हर्च्युअल आयडी'

नवीन बदलानुसार तुम्ही आधार कार्डचा मूळ क्रमांक नाही वापरू शकत. तर तुम्हाला एक नवीन नंबर मिळेल जो यूआईडीएआईच्या वेबसाईवर जाऊन जनरेट होईल. पण नंबर कसा वापरायचा यासाठी या काही खास गोष्टी.

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2018 10:38 PM IST

असा वापरा आधार कार्डचा 'व्हर्च्युअल आयडी'

13 जानेवारी : आताच्या काळात आधार कार्ड खूप महत्त्वाचं बनलं आहे. आपल्या प्रत्येक गोष्टींसाठी आधारकार्ड खूप महत्त्वाचं आहे. पण काही दिवसांपूर्वी सरकारने आधार कार्डबद्दल काही नवीन बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार तुम्ही आधार कार्डचा मूळ क्रमांक नाही वापरू शकत. तर तुम्हाला एक नवीन नंबर मिळेल जो यूआईडीएआईच्या वेबसाईवर जाऊन जनरेट होईल. पण नंबर कसा वापरायचा यासाठी या काही खास गोष्टी.

1) व्हर्च्युअल आयडी कंप्यूटरवरून तयार झालेला 16 अंकी नंबर असेल, जो आवश्यक असेल तर ताबडतोब जारी केला जाईल. हा मार्च 2018 पासून जनरेट केला जाईल.

2) या आयडीमार्फत आधार कार्ड नंबर शिवाय सिमकार्डची पडताळणी करून महत्त्वाची अनेक कामं करता येतील.

3) हा वर्च्युअल आयडी आधारवरून मॅप केला जाईल. आधारधारक अनेक वेळा आयडी तयार करू शकतात. नवीन आयडी तयार झाल्यानंतर जुनी ओळख रद्द केली जाईल.

4) व्हर्च्युअल आयडीरकडून मोबाइल कंपनी किंवा इतर अधिकृत एजन्सीला ग्राहकाचे नाव, पत्ता आणि फोटो मिळेल, ज्याने ते ग्राहकाची पडताळणी करू शकतात.

5) पडताळणीसाठी आधार वापरून सर्व एजन्सींना व्हर्च्युअल आयडी मान्य करणं 1 जून 2018 पासून अनिवार्य राहील. याचं पालन न करणाऱ्या एजन्सींवर दंड आकारण्यात येईल.

6) सरकार देखील केवायसीच्या मूलभूत वापराच्या मर्यादेत असेल. सध्या अनेक कंपनीकडे आपली माहिती पोहचते. पण जेव्हा केवायसीसाठी आधारची गरज कमी होईल, तेव्हा अशा एजन्सीजची संख्या देखील कमी होईल. ज्याने आपली माहिती कोणाकडे जाणार नाही आणि गुन्हेगारीवरही चाप बसेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 10:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close