...म्हणून C-60 फोर्सला नक्षलवादी घाबरतात

...म्हणून C-60 फोर्सला नक्षलवादी घाबरतात

C-60 जवान कोण असतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत कशी असते याबद्दल लोकांच्या मनात कमालीची उत्सुकता असते.

  • Share this:

गडचिरोली, 01 मे: गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात महाराष्ट्र पोलीस दलातील 15 जवान शहीद झाले. हे सर्व जवान सी-60 फोर्समधील होते. C-60 जवान कोण असतात आणि त्यांची काम करण्याची पद्धत कशी असते याबद्दल लोकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. या फोर्सची कामगिरी इतकी अचूक असते की नक्षलवादी देखील त्यांना घाबरतात. जाणून घेऊयात C-60 फोर्सबद्दल...

हे देखील वाचा: जवानांच्या हालचालीची गुप्त माहिती उघड झाली आणि घात झाला

गेल्या काही वर्षापासून C-60 फोर्सबद्दल खुप चर्चा आहे. विशेषत: गेल्यावर्षी याच पथकातील जवानांनी गडचिरोलीमध्ये 40 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. हे जवान अनेक तास जेवण आणि पाण्याशिवाय शत्रू विरुद्ध लढू शकतात. विशेष म्हणजे भारतातील ही एकमेव अशी फोर्स आहे ज्याची जिल्हा स्तरावर निर्मिती करण्यात आली आहे. या फोर्समधील जवानांना जंगलातील प्रत्येक कोपऱ्याची माहिती असते. सर्व साधारणपणे या पथकात त्याच परिसरातील युवकांची निवड केली जाते. C-60 फोर्समध्ये अधिक तर गडचिरोलीमधील आदिवासी युवकांचा समावेश आहे. ज्यांना जंगलाबद्दल पूर्ण माहिती असते.

विशेष फोर्स

C-60 फोर्स एक विशेष जवानांचे पथक आहे. या फोर्समधील जवानांना जंगलातील चकमकीसाठी प्रशिक्षित केले जाते. या जवानांना हैदराबादमधील ग्रे-हाऊंड्स, मानेसरमधील एनएसजी आणि पूर्वांचलमधील आर्मीच्या जंगल वॉरएअर स्कूलमध्ये ट्रेनिंग दिला जाते. या पथकातील जवानांकडे पोलिसांप्रमाणे शस्त्रे नसतात. तर त्यांना विशेष शस्त्रे दिली जातात.

कशी तयार झाली C-60

नक्षलवाद्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्याच जिल्ह्यातील लोकांचा समावेश असलेले पथक तयार केल्यास त्याचा जास्त फायदा होईल, या विचारातून C-60च्या निर्मितीचा विचार पुढे आला. स्थानिक लोकांना जंगलाची माहिती असते. तसेच हे युवक इतरांपेक्षा अधिक सक्षम असतात. त्यांना थोडे प्रशिक्षण दिले तर नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी ते योग्य ठरली. या कारणांमुळेच C-60ची निर्मिती करण्यात आली.

किती जवान आहेत

C-60 पथकाची निर्मिती 1990मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये झाली. पहिल्या पथकामध्ये 60 जवान होते. त्यातूनच C-60 असे नाव देण्यात आले. या सर्व जवानांना येथील स्थानिक भाषा आणि संस्कृती बद्दल चांगली माहिती असते. सध्या या जवानांची संख्या 100च्या आसपास आहे. असे असले तरी अजून ही या पथकाला C-60 असेच म्हटले जाते.

अनेक तास जेवणा-पाण्याशिवाय लढण्याची तयारी

C-60 फोर्समधील जवानांना खास प्रशिक्षण दिलेले असते. जंगलात अनेक तास जेवण, पाणी न घेता ते कारवाई करु शकतात. सर्व साधारणपणे हे जवान जेवण आणि पाणि सोबत ठेवतात. प्रत्येक जवानांकडे 15 किलो वजन असते. यात जेवण, पाणी, औषध आणि अन्य साहित्य असते.


VIDEO : गडचिरोलीत जिथे स्फोट घडला 'त्या' परिसरात पोहोचला न्यूज18 लोकमतचा प्रतिनिधी, संपूर्ण आढावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 06:03 PM IST

ताज्या बातम्या