चमचम गजभियेचा अखेर संघर्ष संपला..नेतृत्त्व वादातून झाला होता सशस्त्र हल्ला

चमचम गजभियेचा अखेर संघर्ष संपला..नेतृत्त्व वादातून झाला होता सशस्त्र हल्ला

तृतीयपंथीयांचे नेतृत्त्व करण्याच्या वादातून सशस्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेली विदर्भातील नामांकित तृतीयपंथी (किन्नर) चमचम गजभियेचा (25, रा. मानकापूर) अखेर जीवनसंघर्ष संपला.

  • Share this:

हर्षल महाजन, (प्रतिनिधी)

नागपूर, 12 जून- तृतीयपंथीयांचे नेतृत्त्व करण्याच्या वादातून सशस्त्र हल्ल्यात गंभीर जखमी झालेली विदर्भातील नामांकित तृतीयपंथी (किन्नर) चमचम गजभियेचा (25, रा. मानकापूर) अखेर जीवनसंघर्ष संपला. लकडगंजमधील खासगी हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास चमचमची प्राणज्योत मालवली. किन्नर गुरू उत्तमबाबा सेनापती याने साथीदाराच्या मदतीने 5 जूनला दुपारी 1 वाजता चमचमवर चाकू, तलवारीने हल्ला केला होता. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. कळमन्यातील कामनानगरात हा थरार झाला होता. मागील सात दिवसांपासून चमचमचा जीवन-मृत्यू असा संघर्ष सुरु होता.

चमचमच्या मृत्यूचे वृत्त समजताच शेकडो तृतीयपंथी हॉस्पिटल परिसरात जमा झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास मेयो हॉस्पिटलमध्ये चमचमवर शवविच्छेदन झाले. नंतर तिचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पहिल्यांदाच सार्वजनिक अंत्यसंस्कार..

चमचमची मंगळवारी दुपारी 4 वाजता मानकापुरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तृतीयपंथींचे अंत्यसंस्कार गुप्तपणे करण्याची परंपरा आहे. मात्र, या परंपरेला छेद देऊन चमचमच्या रुपात पहिल्यांदाच तृतीयपंथींचे सार्वजनिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

पैशांच्या वाटणीतून झाला चमचमवर हल्ला..

पैशांच्या वाटणीतून चमचमवर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. हल्लेखोर उत्तमबाबा हा वाटणीचा अधिक भाग ठेवत होता. त्याला चमचमने विरोध केला होता. त्यामुळे दोन गट पडले होते. चमचमच्या गटात 30 तृतीयपंथी सहभागी झाले होते. पैशाचा वाद आणि शहरातील वर्चस्व संपुष्ठात येण्याच्या भीतीने कट रचून उत्तमबाबाने साथीदारांच्या मदतीने चमचमवर हल्ला केला होता.

'त्या' दोघांची वैद्यकीय तपासणी...

याप्रकरणी पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून उत्तमबाबा, चट्टू ऊर्फ कमल अशोक उईके, किरण अशोक गवळी, सोनू पारशिवनीकर व अन्य एकाला अटक केली. उत्तमबाबा व किरण हे दोघे तृतीयपंथी आहेत किंवा नाही, याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे दोघेही मेयो हॉस्पिटलमध्ये भरती असल्याची माहिती आहे.

CycloneVayu: बळीराजाची चिंता वाढणार, मान्सून आणखी लांबणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2019 04:45 PM IST

ताज्या बातम्या