अमरावतीत दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश

या वाघिणीला पकडण्यासाठी हैदराबाद आणि अमरावती वन विभाग, बोर व्याघ्र प्रकल्पाची टीम मागावर आहे. मात्र ही वाघीण हाती लागत नाही. मात्र या वाघिणीला रेडिओ कॉलर लावलं असल्याने तिचं लोकेशन शोधलं जातंय.पण अजून तरी या वाघिणीचा शोध लागलेला नाही.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2017 11:13 AM IST

अमरावतीत दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश

अमरावती, 04 ऑक्टोबर: अनेकांवर हल्ला करणाऱ्या आणि दोन जणांचे जीव घेणाऱ्या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत.

ब्रम्हपुरीच्या जंगलातून बोर अभयारण्यात सोडलेल्या वाघिणीने आतापर्यंत 50 जनावरं आणि 4 लोकांवर हल्ला केला आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. या वाघिणीचे मोठ्या प्राणात शोधकार्य चालू आहे. या वाघिणीला पकडण्यासाठी हैदराबाद आणि अमरावती वन विभाग, बोर व्याघ्र प्रकल्पाची टीम मागावर आहे. मात्र ही वाघीण हाती लागत नाही. मात्र या वाघिणीला रेडिओ कॉलर लावलं असल्याने तिचं लोकेशन शोधलं जातंय.पण अजून तरी या  वाघिणीचा शोध लागलेला नाही.

 

काही काळापूर्वी या वाघिणीला ब्रम्हपुरी अरण्यात  शुद्ध करून पकडण्यात आले होते. तेव्हा ही तिला ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते.पण प्राणीप्रेमींनी तिला वाचवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. हाय कोर्टाने ती मान्य करत तिला ठार मारण्याचे आदेश रद्द केले होते.  नंतर तिला बोर व्याघ्र अभयारण्यात मोकळे सोडण्यात आले होते.  या वाघिणीने बोर व्याघ्र अभयारण्याच्या आसपास दोन जणांवर हल्ला करून ठार केले कर ब्रम्हपुरी परिसरात पाच जणांवर हल्ला केला होता त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.

मंगळवारी ही वाघीण अमरावती जिल्ह्यातील वरुड भागात दिसली. तिने शेतात रखवाली करणाऱ्या पणोली हिरालाल नावडे या महिलेला ठार केलं. पणोली नावडे या महिलेची या वाघिणीने हत्या केल्यानंतर एका जनावराची हत्या केली, यामुळे शेतकऱ्यांना शेतात, जंगलात जाणं कठीण होऊन बसलंय.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 10:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...