चिमुकल्याच्या अपहरणाचा डाव फसला; क्लोरोफॉर्ममुळे चेहरा झाला विद्रुप

चिमुकल्याच्या अपहरणाचा डाव फसला; क्लोरोफॉर्ममुळे चेहरा झाला विद्रुप

आरुष राहत असलेल्या बदलापुरातील गोपाळ हाईट्स या इमारतीतच राहणाऱ्या सुनील पवार यांनी त्याचे अपहरण करताना त्याला बेशुद्ध करण्यासाठी तोंडाला क्लोरोफॉर्म वापरले. त्यामुळे अरुषचे चेहरा काळा नीळा पडला आहे.

  • Share this:

बदलापूर,07 नोव्हेंबर: खंडणीसाठी आपल्याच मालकाच्या मुलाचे अपहरण करण्याचा डाव फसल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे.७ वर्षाच्या आरुषचे अपहरण करताना आरोपीने त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्याच्या तोंडाला क्लोरोफॉर्म लावल्याने त्याचा चेहरा मात्र विद्रुप झाला आहे. बदलापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अपहरणकर्त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

आरुष राहत असलेल्या बदलापुरातील गोपाळ हाईट्स या इमारतीतच राहणाऱ्या सुनील पवार यांनी त्याचे अपहरण करताना त्याला बेशुद्ध करण्यासाठी तोंडाला क्लोरोफॉर्म वापरले. त्यामुळे अरुषचे चेहरा काळा नीळा पडला आहे. बदलापुरातील शेखर परब या नामवंत बांधकाम व्यावसायिकाचा अरुष मुलगा आहे. काल संध्याकाळच्या सुमारास आरुष हा इमारतीखाली खेळत होता ,मात्र बराच वेळ तो घरी आला नाही म्हणून आरुषची मावशी आणि बहीण त्याला शोधायला इमारतीखाली आल्या , बराच वेळ शोध घेतल्या नंतर इमारतीच्या मागच्या भागात एका रिक्षात आरुषला कोणीतरी तोंड दाबून ठेवल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाकडून आरुषला ओढून घेत आरुषची सुटका केली.

अपहरण करणारा तरुण हा शेखर परब यांच्याकडे २० वर्षांपासून काम करणाऱ्या महादेव पवार याचा मुलगा. आधी आपण आरुष सोबत खेळत असल्याचा बहाणा त्याने केला , मात्र काही वेळा नंतर घरी गेलेल्या आरुषचे तोंड निळसर आणि लाल पडू लागले. तेव्हा आरुषला डॉक्टरांकडे नेले असता त्याला क्लोरोफार्म लावण्यात आला असल्याचे समोर आले.त्यावेळी सुनील हा आरुषचे अपहरण करण्याचा प्रयत्न करीत होता हे अरुषच्या कटुंबियांच्या लक्षात आले. आरुषच्या कुटुंबाने बदलापूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सुनीलच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सुनीलने पैशासाठी आरुषचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. मात्र त्याला क्लोरॅफार्म कसा मिळाला त्याचा कोणी साथीदार आहे का याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2017 10:33 AM IST

ताज्या बातम्या