खडसेंना पंतप्रधानही व्हावंसं वाटेल,गिरीश महाजनांचा टोला

'मंत्रिमंडळात अनेक लहान नेते आहे त्यांनाही मोठ्यापदावर जाण्याची संधी मिळालीये. केंद्रापासून ते जळगावपर्यंत लहानांपासून ते वरिष्ठांपर्यंत अनेकांना संधी मिळालीये'

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2018 05:23 PM IST

खडसेंना पंतप्रधानही व्हावंसं वाटेल,गिरीश महाजनांचा टोला

नाशिक, 05 आॅगस्ट : एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हावंसं वाटेल अशी प्रत्येकाची इच्छा असते पण पक्षालाही तसं वाटलं पाहिजे अशा शब्दात भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सणसणीत टोला लगावलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते.

पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल जळगावमध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला.

एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे, मार्गदर्शक आहे. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलंय, ते महसूल मंत्री राहिले आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा बोलून दाखवली असेल तर त्यात काही वाईट नाही. त्यांचा तो अधिकारच आहे. पक्षाच्या निर्णयामुळे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो नाही असंही त्यांनी सांगितलं पण भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोठ्यापदावर जाण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तशीच संधी मिळालीये असा टोला महाजनांनी लगावला.

तसंच मंत्रिमंडळात अनेक लहान नेते आहे त्यांनाही मोठ्यापदावर जाण्याची संधी मिळालीये. केंद्रापासून ते जळगावपर्यंत लहानांपासून ते वरिष्ठांपर्यंत अनेकांना संधी मिळालीये हीच खदखद खडसेंनी बोलून दाखवली असावी. त्यामुळे एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हावंसं वाटेल अशी प्रत्येकाची इच्छा असते पण पक्षालाही तसं वाटलं पाहिजे असा टोलाही गिरीश महाजन यांनी टोला लगावलाय.

मागील आठवड्यात जळगाव महापालिका निवडणुकीत  राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिलाय. महाजनांच्या या विजयामुळे खडसेंची अस्वस्था वाढलीये.

Loading...

विशेष म्हणजे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद सर्वश्रूत आहे. खडसेंना भूखंड घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांचं कौतुक करत उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकाप्रकारे महाजनांवर सोपवली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या खडसेंनी अनेक वेळा आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.

हेही वाचा..

VIDEO: मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडली

ही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश

VIDEO: भरसभेत राज्यमंत्रीने महिलेचा पदर डोक्यावरून सरकवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2018 05:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...