19 डिसेंबर : एकनाथ खडसे विस्थापित नाहीत, तर विस्थापित नेते आहेत, असं विधान केलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.पत्रकारांशी ते आज नागपुरात अनौपचारिक गप्पा मारत होते. एकनाथ खडसे हे फटकळपणे बोलतात, याचं आम्हाला नुकसान होत नसून, उलट त्यांच्या अनुभवाचा फायदा होतो,असे लोक अॅसेट असतात, असंही फडणवीस म्हणाले.
राणेंबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. राणेंचं पुनर्वसन आम्ही करणार आहोत, त्यांना आमच्या कोट्यातून आम्ही घेणार आहोत, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही, असं ते म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
पुनर्वसन विस्थापितांचं होतं. नाथाभाऊ (एकनाथ खडसे) प्रस्थापित नेते आहेत. खडसे किंवा राणे यांचं फटकळ बोलणं अडसर ठरण्यापेक्षा आमच्यासाठी त्यांचा अनुभव महत्त्वाचा आहे. असे लोक 'अॅसेट' असतात.
राणेंचं पुनर्वसन होणार आहे, ते आमच्यासोबत आहेत. राणेंना आम्ही आमच्या कोट्यातून घेणार आहोत, त्यामुळे शिवसेनेच्या विरोधाचा प्रश्नच येत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा