एकेकाळचे कट्टर वैरी असलेल्या जैनांना खडसेंनी भरवली भजी

जळगाव शहरालगत मेहरून येथे सुरू असलेल्या भजी महोत्सवामध्ये एकत्र आले. एका टेबलावर बसले, नुसतेच बसलेच नाही तर खडसेंनी सुरेश जैन याना भजी भरवली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2017 09:09 PM IST

एकेकाळचे कट्टर वैरी असलेल्या जैनांना खडसेंनी भरवली भजी

प्रफुल्ल साळुंखे, जळगाव, 09 जुलै : खान्देशच्या राजकारणात नवे सूर पाहायला मिळालेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री सुरेश दादा जैन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आज समोरासमोर आले. जळगाव शहरालगत मेहरून येथे सुरू असलेल्या भजी महोत्सवामध्ये एकत्र आले. एका टेबलावर बसले, नुसतेच बसलेच नाही तर खडसेंनी सुरेश जैन याना भजी भरवली. या घास भरण्याच्या कार्यक्रमाची चर्चा जिल्हयात सुरू आहे.

घरकुल घोटाळ्यात जैन याना तुरुंगाची हवा खायला लावण्या इतपत जैन खडसे यांनी दुश्मनी टोकाला गेली होती. जैन यांनीही खडसे पायउतार होताच तुरुंगातून सुटका करून घेतली. हा वाद आणखी विकोपाला जाईल अशी सद्या परिस्थिती होती. पण राजकारणतपासून सध्या तरी लांब राहण्याचं धोरण जैन यांनी घेतलं आहे.

या वेळी पिप्रला इथे रथाच्या कार्यक्रमात खडसे जैन एकत्र आले होते. आता तर खडसे आणि जैन यांच्या दिल जमाईच्या फोटोने नवी राजकीय समीकरण जुळतात की खडसेंनी खाऊ घातलेली मिरचीची भजी जैन यांना तिखट लागते याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2017 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...