काय सांगताsss चालकाने छत्री धरून चालवली केडीएमसीची गळकी बस

केडीएमसीच्या एका गळक्या बसमध्ये चालक चक्क छत्री धरून बस चालवत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 10:04 PM IST

काय सांगताsss चालकाने छत्री धरून चालवली केडीएमसीची गळकी बस

प्रदीप भाणगे (प्रतिनिधी)

कल्याण, 29 जून- केडीएमसीच्या एका गळक्या बसमध्ये चालक चक्क छत्री धरून बस चालवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे, तर प्रवाशांच्याही डोक्यावर धारा लागल्यानं त्यांनाही बसमध्येच छत्र्या उघडून बसावं लागलं. चालक छत्री हातात धरून बस चालवताना तर गळक्या बसमध्ये प्रवाशांच्या डोक्यावर पाण्याच्या धारा पडत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. केडीएमसीच्या बसमधला हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. बसचा हा व्हिडीओ समोर येताच केडीएमसीचे अधिकारी खळबळून जागे झाले आहेत. संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश केडीएमसी परिवहनचे सभापती मनोज चौधरी यांनी दिले आहेत.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन सेवा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे वादात सापडत असते. त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर चक्क बसमध्येच पावसाचं पाणी गळत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं चालकाला चक्क डोक्यावर छत्री धरून बस चालवावी लागली. तर प्रवासीही बसमध्येच छत्री उघडून बसले. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि केडीएमटीच्या अब्रूची लक्तरे निघाली. हा व्हिडीओ शुक्रवारचा असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकाराची केडीएमसी परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. यात जो कुणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन चौधरी यांनी दिले आहे.

'जगबुडी'चा नवीन पूल वाहतुकीपूर्वीच खचला, अधिकाऱ्यांना चक्क पुलाला बांधले

कोकणात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरचा नवीन पूल वाहतुकीपूर्वीच खचल्याने प्रशासनाच्या निकृष्ट कामाची पोलखोल झाली आहे. पुलाची अवस्था पाहून मनसेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चक्क पुलाला बांधून ठेवले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.

Loading...

जगबुडी नदीवरचा नवीन पूल वाहतुकीपूर्वीच खचला. जोड रस्त्याला मोठी भगदाडं पडली आहेत. पुलाच्या संरक्षक भिंतीला देखील गेले तडेही गेले आहेत. यंदाच हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणार होता. मात्र पहिल्या पावसातच पुलाची दुर्दशा झाली आहे. यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. नवीन पूल सकाळी खचल्यानंतर दिवसभर अधिकारी न आल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.

महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्ठळी येताच संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि त्यांना चक्क पुलाला बांधले होते.

VIDEO : मनसैनिकांनी महामार्ग अधिकाऱ्यांना 'अशी' दिली शिक्षा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2019 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...