पुणे दुर्घटना: मृतक एकाच गावातील, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखाची मदत! Kondhwa | Pune |

पुण्यात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील सर्व कामगार बिहारमधील एकाच गावातील आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 03:17 PM IST

पुणे दुर्घटना: मृतक एकाच गावातील, मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखाची मदत! Kondhwa | Pune |

पुणे, 29 जून: पुण्यातील कोंढवा येथे शनिवारी मध्यरात्री इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. 60 फूट उंच इमारत कामगारांच्या कच्च्या घरावर पडली आणि 4 महिला आणि 2 मुलांसह 15 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील सर्व जण बिहारमधील कटिहार येथील रहिवासी आहेत. कटिहारमधील बलरामपूर पोलिस ठाणे क्षेत्रातील बघार गावांतील हे सर्व कामगार होते. कटिहारचे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बघार गावात अधिकाऱ्यांना पाठवले आहे. दरम्यान, हे कामगार जरी बाहेरच्या राज्यातील असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे. तसेच मृत झालेल्या कामगारांचे मृतदेह त्यांच्या गावी विमानाने पाठवले जातील असेही राज्य सरकारने सांगितले आहे.

पुण्यात मृत्यूचे तांडव; 15 जण ठार, ही आहेत मृतांची नावे

Loading...

NDRFकडून मदत जाहीर

घटनेचे वृत्तकळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर NDRFचे पथक देखील दाखल झाली आणि त्यांनी मदत कार्य सुरु केले. या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना NDRFकडून 4 लाखाची मदत जाहीर केली आहे. या घटनेचे वृत्त कळताच बघार गावात वातावरण शोकाकूल झाले आहे.

कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांना कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.

चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली, इतर 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...