पुण्यात काश्मिरी पत्रकार तरुणाला मारहाण

पुलवामा हल्ल्यानंतर काही समाजकंटकांकडून काश्मिरी तरुणांना त्रास दिला जात असल्याचं दिसत आहे.

41 | Updated On: Feb 22, 2019 04:01 PM IST

पुण्यात काश्मिरी पत्रकार तरुणाला मारहाण

पुणे, 22 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर देशातील काही भागात काश्मिरी तरुणांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशातच आता पुण्यातही एका इंग्रजी दैनिकाचा पत्रकार असणाऱ्या काश्मिरी तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

जिब्रन नाझीर असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणांच नाव असून तो एका इंग्रजी वृत्तपत्रात कॉपी एडिटर म्हणून काम करत आहे. या तरुणाला झालेली मारहाण नक्की कुणी केली हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु महाराष्ट्रात अशा प्रकारची ही दुसरी घटना घडली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर काही समाजकंटकांकडून काश्मिरी तरुणांना त्रास दिला जात असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रात काश्मिरी तरुणाला मारहाण झाल्याची ही दुसरी घटना आहे.

यवतमाळ इथं शिक्षणासाठी आलेल्या काश्मीरच्या विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. 3 ते 4 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.


VIDEO : 'सरकार आपल्याला फसवण्याच्या तयारीत', आरक्षणावरून धनगर नेते आक्रमक

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 11:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...