S M L

कारवार नाविक तळात तीन संशयित घुसले, हायअलर्ट जारी

कारवार येथील कदंब नाविक तळावर तिघे संशयित घुसले असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती.

Sachin Salve | Updated On: Jun 22, 2017 11:51 PM IST

कारवार नाविक तळात तीन संशयित घुसले, हायअलर्ट जारी

संदीप राजगोळकर, कर्नाटक

22 जून : कारवार येथील कदंब नाविक तळावर तिघे संशयित घुसले असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. नाविक दलाने याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर करून माहिती दिली आहे.

कारवार तालुक्यातील या नाविक तळास राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण काम मूळ धोका निर्माण झाला आहे नाविक दलाच्या बाजूलाच महामार्ग काम सुरू आहे. यासह जवळील चंडिया आणि हट्टीगेरी या दोन गावातील स्थानिकांचा येणे जाणे वाढलं असून अनेक जण नाविक तळात येत जात आहेत अस स्पष्ट केलं आहे.गेल्या 10 दिवसांत दोन नाविक तळात स्थानिक लोक आत आलेली दोन प्रकरण घडली असून तीन ग्रामस्थाना ताब्यात घेऊन सोडण्यात आले होते. आज देखील वर्जित क्षेत्रात तिघांनी प्रवेश केला होता त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात ते फरारी झाले होते. अनेक जण नाविक तळजवळ असलेल्या बीचवर मासेमारी करण्यासाठी येत असतात. असं देखील पत्रकात म्हटलं आहे. घुसखोरोनंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवली होती. मात्र प्रवेश केलेले स्थानिक वापस आले आहेत. वर्जित क्षेत्रात स्थानिक लोकांनी  प्रवेश करणे गुन्हा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 22, 2017 11:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close