S M L

कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्याच बाजूने -राज ठाकरे

जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होत आहे. पण तरीही त्यांना संधी दिली जात नाहीये.

Sachin Salve | Updated On: May 16, 2018 05:59 PM IST

कर्नाटकचे राज्यपाल भाजपच्याच बाजूने -राज ठाकरे

रायगड, 16 मे : कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला हे गुजरातचे आहे. त्यात ते नरेंद्र मोदी यांचे खास आहे. त्यामुळे ते भाजपच्या बाजूनेच वागतील असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

कर्नाटकात भाजपचं बहुमत हुकल्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसने सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडालीये. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर आहे. कर्नाटकमध्ये सत्तेसाठी भाजपची आटापिटा करतोय. जेडीएस आणि काँग्रेसचं सरकार स्थापन होत आहे. पण तरीही त्यांना संधी दिली जात नाहीये.  गोवा, मणिपूरमध्ये भाजपने कमी जागा असून सुद्धा सत्ता स्थापन केली. जे तिथे झालं होतं तसं इथं का होत नाही असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

जे राज्यपाल आहे ते गुजरातचे आहे. मला जी माहिती मिळाली. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपली जागा सोडली होती. वजुभाई वाला हे नरेंद्र मोदी यांच्या संपर्कातले आहे. त्यामुळे साहजिकच ते भाजपच्या झुकतं माप देतील असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 05:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close