13 एप्रिल : मोदींच्या दीक्षाभूमी भेटीवरुन जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावलाय. उशिरा का होईना पंतप्रधानाना बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली असं तो म्हणाला. आज कन्हैयाने नागपूरच्या दीक्षाभूमीला भेट दिली.
कन्हैयाने लिहिलेल्या 'बिहार ते तिहार' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं आज प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्याने मी कोण आहे हे लोकांना कळावं यासाठी हे पुस्तक लिहिलं असून मी मूळचा लेखक नाही, यापुढे पुन्हा पुस्तक लिहिणारही नाही, त्यामुळे काहींना घाबरण्याचं कारण नाही, माझ्या या पुस्तकामुळे क्रांती होईल असं नाही, मात्र काहीतरी हालचाल नक्कीच होईल असं सांगायलाही तो विसरला नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा