S M L

मी निवडणूक लढवणार नाही- कन्हैया कुमार

आपल्या भाषणात कन्हैयानं केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. कोल्हापूर ही क्रांतीची भूमी आहे. कोल्हापूरला कॉ. गोविंद पानसरेंचा वारसा आहे त्यामुळं इथून क्रांतीची सुरुवात व्हावी असं आवाहनही कन्हैयाने केलं. कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये ही सभा पार पडली.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 8, 2017 01:54 PM IST

मी निवडणूक लढवणार नाही- कन्हैया कुमार

कोल्हापूर,08 नोव्हेंबर: आपण निवडणूक लढवणार नाही अशी माहिती आज जेएनयूचा माजी विद्यार्थी युनियन अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी दिली आहे. तो कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.

जेएनयूच्या प्रकरणानंतर चर्चेत आलेला कन्हैया कुमार निवडणूक लढवणार का याबद्दल चर्चा चालू होत्या. आज आपल्या समाजात भगव्या रंगाची मदता घेऊन दहशतवाद पसरवला जातोय अशी टीकाही कुमार यांनी केली. 'आज समाजात भगव्या रंगाचा आधार घेऊन दहशत माजवत आहेत. पण भगवा रंग हा त्याग आणि बलिदानाचं प्रतिक आहे..तसंच हा रंग छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजीमहाजारांचा आणि संत तुकारामांचा आहे'.

आज कोल्हापूरमध्ये विद्यार्थी संघटनांच्या वतीनं कन्हैया कुमारची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनूी टीका केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी सशर्त सभेला परवानगी देऊनही आज कोल्हापूरच्या सभास्थळी हिंदूत्ववादी संघटनांनी कन्हैयाच्या विरोधात घोषणाबाजी करत सभेला विरोध केला. पण पोलिसांनी परिस्थिती सांभाळत सभा शांततेत पार पडली. आपल्या भाषणात कन्हैयानं केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली. कोल्हापूर ही क्रांतीची भूमी आहे. कोल्हापूरला कॉ. गोविंद पानसरेंचा वारसा आहे त्यामुळं इथून क्रांतीची सुरुवात व्हावी असं आवाहनही कन्हैयाने केलं. कडेकोट पोलिस बंदोबस्तामध्ये ही सभा पार पडली.

कॉ. पानसरेंच्या पत्नी उमा पानसरे या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. दरम्यान कन्हैयानं पानसरेंच्या घरीही भेट दिली तसंच कोल्हापूरमधल्या छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यालाही अभिवादन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close