S M L

खड्ड्यात पाय घसरून तरुण पडला, ट्रकने चिरडले

Updated On: Jul 11, 2018 06:25 PM IST

खड्ड्यात पाय घसरून तरुण पडला, ट्रकने चिरडले

कल्याण, 11 जुलै :  कल्याण मलंग रोडवरील द्वारली गावाजवळील रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याने वर्षभरात तब्बल चौघांचा बळी घेतला आहे. मात्र या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून काही स्थानिक नागरीकाकडून रस्त्याच्या कामाला विरोध होत असल्यामुळे या रस्त्याचे काम रखडल्याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाकडून दिले जात आहे. मात्र या वादात आज एका पादचाऱ्याला हकनाक जीवाला मुकावे लागले आहे. खड्यात पडल्यामुळे ट्रकखाली येऊन एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

'आधी संभाजी भिडेंना अटक करा... मग कामकाज करु'

जवळच्या तबेल्यात काम करणारा अण्णा नावाचा इसम आज मलंग रोडवरील द्वारली गावाजवळील रस्त्याने जात असताना या रस्त्यावरील खड्ड्यात पाय मुरगळून पडला. याच वेळी या रस्त्यावरून जात असलेल्या ट्रक खाली तो आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यापूर्वी या रस्त्यावर दोन महाविद्यालयीन विद्यार्थी एक पुरुषाला खड्ड्यामुळे जीव गमवावा लागला होता. त्यातच आता या वृद्ध माणसाला आपला जीव गमवावा लागला आहे. नगरसेवक कुणाल पाटील यांनी या रस्त्याची दुर्दशा आणि होणाऱ्या अपघातासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. मात्र स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी केलेल्या तक्रारींना पालिकेने केराची टोकरी दाखवल्याचे दिसत आहे. आणखी किती बळी प्रशासन घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आमदार नितेश राणे, प्रताप सरनाईकांनी राजदंड पळवला, 'नाणार'वरून विधानसभेत गोंधळ

या प्रकरणी महापालिका अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही लोक या रस्त्याच्या रुंदीकरणाला विरोध करत आहेत त्यामुळे रस्त्याचे काम रखडले असं उत्तर दिलंय. या प्रकरणी अण्णाच्या मृत्यूनंतर हिल लाईन पोलिसांनी ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केलीये.

Loading...

अखेर ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ मधील क्लॅश टळला

रस्त्याच्या रुंदीकरणावरून वाद असला तरी मात्र रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी काय हरकत तसंच या खड्डयावर प्रशासनाने उपाय केलेला नसल्याने या खड्ड्यानी किती बळी घ्यावेत अशी प्रशासनाची अपेक्षा आहे असा संताप जनक सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय.

 Health Tips: रोज खा या 7 गोष्टी, कधीच होणार नाही गुडघे दुखी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 06:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close