लोकसभेत या खासदाराने केली मुंबई उपनगरी रेल्वेसेवेबाबत पोलखोल!

उपनगरी रेल्वे सेवेचा वारंवार बोजवारा उडत असून पावसाळ्यात परिस्थिती अधीकच गंभीर होण्याची भीती खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात व्यक्त केली.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 07:04 PM IST

लोकसभेत या खासदाराने केली मुंबई उपनगरी रेल्वेसेवेबाबत पोलखोल!

नवी दिल्ली,2 जून- खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मध्यरेल्वेबाबत लोकसभेत पोलखोल केली आहे. उपनगरी रेल्वे सेवेचा वारंवार बोजवारा उडत असून पावसाळ्यात परिस्थिती अधीकच गंभीर होण्याची भीती खासदार श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात व्यक्त केली.

रेल्वेच्या नालेसफाईसंदर्भात गेली अनेक वर्षे सातत्याने शंका उपस्थित होत असून पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी रुळांपासून दहा मीटर अंतरावर संरक्षक भिंत बांधण्याची मागणी देखील डॉ. शिंदे यांनी केली आहे. रेल्वे सेवा ही कल्याण संसदीय क्षेत्राची जीवनरेषा आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या सेवेत सतत काही ना काही बिघाड होत आहे. कधी रेल्वे रुळांमध्ये काही समस्या तर कधी पेंटाग्राफमध्ये बिघाड तर कधी सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड, थंडी आणि पावसात रेल्वेमध्ये बिघाड ही आता नित्याचीच बाब झाल्याचे प्रतिपादन डॉ.शिंदे यांनी केले. दररोज 42 लाख, 50 हजार प्रवासी मध्यरेल्वेच्या मुख्य (सेन्ट्रल) हार्बर आणि ट्रांस हार्बर मार्गावर प्रवास करतात. रेल्वेच्या रोज 1772 फेऱ्या या उपनगरीय रेल्वे मार्गावर चालतात. गेल्या महिनाभर रेल्वे सेवेत जवळपास रोज बिघाड होत आहे. प्रवाशांना दररोज ऑफिसला पोहोचायला विलंब होतो आणि नाहक लेट मार्क लागतो, असेही डॉ. शिंदे म्हणाले. वर्षभरात रेल्वेचे 52 दिवस मेगाब्लॉक असतात. तरीसुद्धा उपनगरीय रेल्वे वेळेवर धावत नाही.

डॉ. शिंदे यांनी रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले की, उपनगरीय रेल्वेपासून सर्वात जास्त महसूल मिळूनही उपनगरीय रेल्वेत सर्वात जास्त समस्या आहेत. आठवड्याला पाच वेळा वेळापत्रक बिघडलेले असते आणि त्याचा फटका रोज लाखो लोकांना बसतो, अशी माहीतीही डॉ. शिंदे यांनी दिली. कल्याण-मुंबई उपनगरी मार्गावर सेवेचा खोळंबा झाल्यास विनाविलंब जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर अथवा धीम्या गाड्या जलद मार्गावर आणाव्यात, तसेच पाणी जिथे जास्त जमते तिकडे अधिक अश्वशक्तीचे पंप लावून पाणी काढायची सुविधा असावी, तसेच  कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कर्जत-कसारा मार्गावर जादा लोकल उपलब्ध असाव्यात, अशीही मागणी डॉ. शिंदे यांनी केली. तसेच या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेटही घेतली.

VIDEO:सावधान! शाळेत जाताना तुमची मुलं तर करत नाहीये ना असा प्रवास?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 27, 2019 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...