कसारा ते नाशिकरोड दरम्यान धावणार लोकल

कसारा ते नाशिकरोड दरम्यान धावणार लोकल

कसारा ते नाशिकरोड दरम्यान लवकरच लोकलची चाचणी घेतली जाणार आहे. आणि ही चाचणी यशस्वी झाली तर नाशिक आणि मुंबईला लोकलनं जोडण्याचं नाशिककरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 नोव्हेंबर : कसारा ते नाशिकरोड दरम्यानच्या लोहमार्गावर लवकरच लोकलची चाचणी घेतली जाणार आहे. आणि ही चाचणी यशस्वी झाली तर नाशिक आणि मुंबईला लोकलनं जोडण्याचं नाशिककरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. लोकलच्या चाचणीसंदर्भात मध्य रेल्वेनं जोरदार तयारी सुरू केलीय. पुढच्या 15 दिवसांत ही चाचणी घेतली जाणार आहे. तसेच राजनाधी एक्स्प्रेसदेखील मनमाडमार्गे वळवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय.


कल्याण ते नाशिक रोड लोकलची येत्या १५ दिवसांत चाचणी घेतली जाणार आहे. नाशिककरांसाठी ही आनंदाची वार्ता असून, अनेक वर्षांपासूनची नाशिककरांची ही मागणी अखेर पूर्ण होताना दिसतेय. मध्य रेल्वेकडून याची तयारी सुरू असून, नाशिकहून जे लोक नोकरीसाठी दररोज मुंबईला ये-जा करतात त्यांच्यासाठी ही मोठी सोय होणार आहे. त्याचबरोबर, राजधानी एक्स्प्रेस मनमाडमार्गे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचीही चाचणी येत्या १५ दिवसांत घेतली जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.


रेल्वेच्या या निर्णयामुळे दररोज नाशिक-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांमध्ये आनंदाची लहर पसरलेला पहावयास मिळत आहे. नाशिक-मुंबई दरम्यान लोकल सेवा सुरू व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून नाशिककरांनी लावून धरली होती. ही चाचणी यशस्वी झाली तर नाशिक आणि मुंबईला लोकलनं जोडण्याचं नाशिककरांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.


 LIVE VIDEO : पेट्रोल पंपावरच ट्रकला लागली मोठी आग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 19, 2018 09:54 PM IST

ताज्या बातम्या