भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला कल्याण डोंबिवलीचा परिसर !

रात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2018 02:19 AM IST

भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला कल्याण डोंबिवलीचा परिसर !

कल्याण , 13 जुलै : खड्ड्यांमुळे बळी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे आधीच भितीच्या सावटाखाली असणारे कल्याण डोंबिवलीकर रात्री साडेनऊच्या सुमारास बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरलेले पाहायला मिळाले. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळ्यासह कल्याणजवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याची माहिती समोर येत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात जाणवलेले धक्के हे भुकंपाचे धक्के होते. रायगड जिल्ह्यात जमिनीखाली ५ किमी खोलीवर या भुकंपाचे केंद्र होते. त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

धक्कादायक, महिलांना लागलंय 'माती' खाण्याचं व्यसन

रात्री 9 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. साधारणपणे 9 वाजून 32 मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे 1 ते 2 मिनिटं हे हादरे जाणवल्याची माहिती कल्याण डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी दिली. अचानक बसलेल्या या गूढ हादऱ्यांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. तर हादऱ्यांमुळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शीनी दिली.

जिम,डायट न करता वजन करा कमी, हे वाचाच !

याबाबत ठाणे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला असता या हादऱ्यांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. हे हादरे म्हणजे भूकंपाचा सौम्य धक्का होता. कल्याण-डोंबिवली परिसरात जाणवलेले धक्के हे भुकंपाचे धक्के होते. रायगड जिल्ह्यात जमीनीखाली ५ किमी खोलीवर या भुकंपाचे केंद्र होते. त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 10:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...