S M L

10 रूपयांमध्ये पिंडीला 'काकस्पर्श'; नाशिकमधला अजब प्रकार

एकदा चोच मारण्यासाठी 10 रुपये वसूल केले गेले. कावळा पिंडाला शिवला तर ते पितरांपर्यंत पोहोचतं, असा समज आहे. आणि त्यामुळे कावळ्याकडून चोच पिंडाच्या प्रसादावर चोच मारण्यासाठी लोकही गर्दी करत असल्याचं या व्हिडिओत आपल्याला दिसतंय

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 11, 2017 03:53 PM IST

10 रूपयांमध्ये  पिंडीला 'काकस्पर्श'; नाशिकमधला अजब प्रकार

 नाशिक,11 सप्टेंबर: पितृपक्षात पिंडदान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे. यासाठी कावळा महत्त्वाचा असतो. पण सध्या हे कावळे सहजासहजी सापडत नाहीत म्हणून नाशिकमध्ये चक्क एका जखमी कावळ्याला पकडून पिंडीजवळ आणण्यात आलं .

शहरीकरणामुळे कावळ्यांची संख्या कमी झालीय. अशातच नाशिकमध्ये एक जखमी कावळा सापडला. त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून देण्याऐवजी त्याचा धंद्यासाठी वापर करण्यात आला. कावळ्याला पकडून पिंडाला चोच मारण्याचा धंदा सुरू केला. आता कावळेच दुर्मिळ झाले असल्यानं त्याचा धंदाही तेजीत चाललाय. एकदा चोच मारण्यासाठी 10 रुपये वसूल केले गेले. कावळा पिंडाला शिवला तर ते पितरांपर्यंत पोहोचतं, असा समज आहे. आणि त्यामुळे कावळ्याकडून चोच पिंडाच्या प्रसादावर चोच मारण्यासाठी लोकही गर्दी करत असल्याचं या व्हिडिओत आपल्याला दिसतंय. यात बिचाऱ्या कावळ्याचे मात्र हाल होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2017 12:07 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close