News18 Lokmat

पत्नीवर गोळीबार करून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

आत्महत्या करण्यापूर्वी विजयकुमार यांनी पत्नीवर गोळीबारही केला. या गोळीबारात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2019 09:31 AM IST

पत्नीवर गोळीबार करून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

सोलापूर, 22 मार्च : मंत्रालयात सहसचिव विजयकुमार पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विजयकुमार यांनी पत्नीवर गोळीबारही केला. या गोळीबारात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावातील असणारे विजयकुमार पवार हे मंत्रालयात सहसचिव म्हणून काम पाहत होते. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी सोनाली पवार यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये जखमी झालेल्या सोनाली पवारांना उपचारासाठी सोलापूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विजयकुमार पवार यांची काही महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली होती. सध्या ते मुंबईतील मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस नाईक हरिदास सलगर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.


Loading...

VIDEO : या आहेत लोकसभेतील टाॅप लढती, कुणाविरोधात कोण लढणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 22, 2019 09:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...