Elec-widget

जातीवाद पेरण्याचं काम का करताय? रिपब्लिकन नेत्याची प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका

जातीवाद पेरण्याचं काम का करताय? रिपब्लिकन नेत्याची प्रकाश आंबेडकरांवर जोरदार टीका

'जातीअंताचे आंदोलन भारिप बहुजन महासंघ करत आहे. मग या आंदोलनाला दफन करून पुन्हा जातीयवाद पेरण्याचं काम त्यांनी का करावं?'

  • Share this:

अहमदनगर, 17 मार्च : 'जातीयवाद टाळण्यासाठी उपाय सुचवणारे प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांच्या नावापुढे जात का लिहिली?' असा सवाल करत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी वंचित बहुजन आघाजी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

'जातीअंताचे आंदोलन भारिप बहुजन महासंघ करत आहे. मग या आंदोलनाला दफन करून पुन्हा जातीयवाद पेरण्याचं काम त्यांनी का करावं?जातीय प्रथा बळकट करण्याचा नवीन प्रयोग करण्याचा अट्टाहास प्रकाश आंबेडकरांनी टाळला पाहिजे,' असा सल्लाही जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.

जोगेंद्र कवाडे यांनी काही गोष्टींवरून आंबेडकर यांना सुनावताना त्यांना एक ऑफरही दिली आहे. 'रामदास आठवले हे धर्मनिरपेक्ष नव्हते. ते भाजपमध्ये होते. त्यांना डिलिट करून टाका. बहुजन वंचित आघाडी ही महाआघाडीत विलीन करून प्रकाश आंबेडकरांनी या महाआघाडीचे नेतृत्व करावं,' असं आवाहन जोगेंद्र कवाडे यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून नुकतीच 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना उमेदवारांच्या नावापुढे जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यावरूनच कवाडेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर वंचित आघाडीकडून 48 पैकी 37 उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मात्र, भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. मध्यतंरी प्रकाश आंबेडकर हे सोलापूरमधून निवडणूक लढणार अशी चर्चा होती. परंतु, या यादीत सोलापूरच्या जागाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.

Loading...

वंचित आघाडीची पहिली यादी

वर्धा - धनराज वंजारी

रामटेक - किरण रोडगे - पाटनकर

भंडारा - गोदीया :- एन के नान्हे

चंद्रपूर :- राजेंद्र महाडोळे

गडचिरोली :- रमेश गजबे

यवतमाळ :- प्रवीण पवार

बुलढाणा :- बळीराम सिरस्कार

अमरावती :- गुणवंत देवपारे

हिंगोली :- मोहन राठोड

नांदेड :- यशपाल भिंगे

परभणी :- आलमगीर खान

बीड :- विष्णू जाधव

उस्मानाबाद :- अर्जुन सलगर

लातूर :- राम गारकर

जळगाव :- अंजली बाविस्कर

रावेर :- नितीन कंडोलकर

जालना :- शरदचंद्र वानखेडे

रायगड :- सुमन कोळी

पुणे :- अनिल जाधव

बारामती :- नवनाथ पडळकर

माढा :- विजय मोरे

सांगली :- जयसिंग शेंडगे

सातारा :- सहदेव एवळे

रत्नागिरी - सिधुदुर्ग :- मारुती जोशी

कोल्हापूर :- अरुणा माळी

हातकणंगले :- अस्लम सययद

नंदुरबार :- दाजमल मोरे

दिंडोरी :- बापू बंडे

नाशिक :- पवन पवार

पालघर :- सुरेश पडवी

भिवंडी :- ए डी सावंत

ठाणे :- मल्लिकार्जुन पुजारी

मुबंई साउथ दक्षिण :- अनिल कुमार

मुबंई साउथ दक्षिण मध्य :- संजय भोसले

ईशान्य मुबंई :- संभाजी काशीद

मावळ :- राजाराम पाटील

शिर्डी :- अरुण साबळे


SPECIAL REPORT: सेनेच्या 'या' मतदारसंघात भाजपने केला दावा; नव्या वादाची चिन्हं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 17, 2019 01:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...