S M L

गावागावात 'वाॅटर कप'चं तुफान,जितेंद्र जोशीनं केलं मार्गदर्शन

पाच वर्ष दुष्काळाशी झगडणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळमुक्तीचा संकल्प घेऊन आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनने वॉटर कप ही स्पर्धा आयोजित केलीय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 19, 2017 01:01 PM IST

गावागावात 'वाॅटर कप'चं तुफान,जितेंद्र जोशीनं केलं मार्गदर्शन

19 एप्रिल : पाच वर्ष दुष्काळाशी झगडणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळमुक्तीचा संकल्प घेऊन आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनने वॉटर कप ही स्पर्धा आयोजित केलीय. या जिल्ह्यातल्या 145 गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतलाय.

याच गावकऱ्यांचा विश्वास वाढावा यासाठी काल अभिनेता जितेंद्र जोशीनं परंडा, भूम, कळंब तालुक्यातील गावगावात जाऊन गावकऱ्यांबरोबर श्रमदान करत पाणी फाऊंडेशनचं काम आणि दुष्काळाशी सामना कसा करावा याविषयी मार्गदर्शन केलं.

अगदी संध्याकाळी उशिरापर्यंत जितेंद्र गावागावात फिरत होता आणि शेतकऱ्यांची भेट घेत होता. जितेंद्रला पाहायला गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

'ही स्पर्धा गावागावातली नसून ती दुष्काळाशी आहे  आणि ती आपण सगळे मेहनत करून जिंकणार,'  असा विश्वास जितेंद्र जोशीनं व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 01:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close