'महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, सर्वांनी काळजी घ्यावी'

'महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी!'

News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2019 02:29 PM IST

'महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, सर्वांनी काळजी घ्यावी'


मुंबई, 12 मार्च : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला उपरोधिक टोला लगावला आहे.

'महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी,' असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, सुजय विखे-पाटलांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या समर्थकांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय यांच्या भाजपप्रवेशादरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, बबनराव पाचपुते आदी नेते देखील उपस्थित होते.

सुजय विखे आणि लोकसभा उमेदवारी

Loading...

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी आणि वाजल्यानंतरही सर्वच पक्षात आयाराम आणि गयारामांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अशातच सुजय विखे पाटील यांनी अखेर मंगळवारी (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, पवारांनी नंतर यू-टर्न घेतला. त्यामुळे सुजय विखे पाटलांच्या निवडणूक लढवण्याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता.यावर कोणताच निर्णय निघत नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे प्रयत्नशील होते. यासंदर्भात, भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये नुकतीच बैठकही झाली होती आणि अखेर 12 मार्चला सुजय विखे पाटलांनी भाजपचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील हे नैतिकतेचा प्रश्न म्हणून आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशा चर्चा सुरू होत्या. पण आता विखेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राजीनामा देण्याचा माझा विचार नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 'सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडला कल्पना दिली आहे. मी काँग्रेस पक्षातच असणार आहे आणि पक्ष सांगेल तिच भूमिका घेणार,' अशी माहिती राधाकृष्ण विखेंनी दिली. मुलगा सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटलांची चांगलीच अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण काँग्रेसने त्यांना विरोधी पक्षनेतेपदासारखी मोठी जबाबदारी दिलेली असताना त्यांचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने मोठी चर्चा रंगत आहे. यामुळे, राधाकृष्ण विखे पाटील आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.


VIDEO: रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये? गिरीश महाजन यांनी केला मोठा खुलासा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 02:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...