News18 Lokmat

जितेंद्र आव्हाडांनी मागितली शरद पवारांची माफी, म्हणतात...

राष्ट्रवादीत आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगत मोहिते-पाटील समर्थकांनीही भाजप प्रवेश करण्याच्या रणजितसिंह यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 10:12 AM IST

जितेंद्र आव्हाडांनी मागितली शरद पवारांची माफी, म्हणतात...

मुंबई, 20 मार्च : राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीत आपल्यावर अन्याय होत असल्याचं सांगत मोहिते-पाटील समर्थकांनीही भाजप प्रवेश करण्याच्या रणजितसिंह यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोहिते-पाटलांवर उपरोधिक टीका केली आहे.

'शरद पवारसाहेब मला माफ करा, पण जेवढा अन्याय तुम्ही रणजित मोहिते आणि त्यांच्या पिताश्रींवर केला तेवढाच अन्याय जीतेंद्र आव्हाड व कुटुंबावर पण करा,' असा टोला लगावत जितेंद्र आव्हाड यांनी मोहिते-पाटील कुटुंबीयांना शरद पवारांनी दिलेल्या पदांची आठवण करून दिली आहे.दरम्यान, रणजितसिंह पाटील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रवेशाची घोषणा केली. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भरभरून कौतुक केलं. बुधवारी 12.30 वाजता वानखेडे स्टेडियमवरच्या गरवारे क्लबमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहितीही रणजितसिंह यांनी दिली. तर रणजितने केलेल्या घोषणेला माझी सहमती आहे असं विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले.

Loading...

राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा गेली अनेक दिवस होती. मात्र या प्रवेशावर अंतिम मोहोर उमटली ती सोमवारी 18 मार्च रोजी होणार आहे.

रणजित सिंह माढाचे उमेदवार?

रणजितसिंह मोहिते-पाटील हे भाजपकडून माढातील उमेदवार असणार आहेत, अशी माहिती आहे. माढातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे आता रणजित सिंह मोहिते- पाटील यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.


VIDEO : हवा गेलेला फुगा, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...