जेजुरीच्या मर्दानी दसर्‍यात ''येळकोट येळकोट जय मल्हार''चा जयघोष

तीर्थक्षेत्र जेजूरी येथील जगप्रसिद्ध मर्दानी दसरा सोहळ्याला आज सायंकाळी ६ वाजता प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवाचा पालखी सोहळा पार पडला.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 08:07 PM IST

जेजुरीच्या मर्दानी दसर्‍यात ''येळकोट येळकोट जय मल्हार''चा जयघोष

जेजूरी, 18 ऑक्टोबर - तीर्थक्षेत्र जेजुरी येथील जगप्रसिद्ध मर्दानी दसरा सोहळ्याला आज सायंकाळी ६ वाजता प्रारंभ झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवाचा पालखी सोहळा पार पडला. सदानंदाचा जयघोष आणि भंडारा-खोबऱ्याची उधळण करत देवाची पालखी सीमोल्लंघनासाठी गडकोटाबाहेर पडली.

गुरुवारी सकाळपासूनच जेजुरी गडावर धार्मिक कार्यक्रमांना सुरूवात झाली. गडावरील बालदारीतील देवाचे घट उठवण्यात आले. मुख्य मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा, अभिषेक, गड पूजनाबरोबरच तलवार आणि ध्वज पूजन करण्यात आले. सायंकाळी 6 वाजता देवाचे मुख्य मानकरी पेशव्यांनी आदेश देवून सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी देवसंस्थानच्यावतीने बंदुकीच्या फैरिंची सलामी देण्यात आली. उत्सव मूर्तींना पालखीत ठेवताच संपूर्ण गड कोट देवाच्या जयघोषाने दणाणून गेला. 'यळकोट यळकोट जय मल्हार', 'सदानंदाचा येळकोट'च्या गजरात भाविकांनी भंडारा-खोबऱ्याची उधळण करण्यात आली. निशाण, अब्दागिरी, चौघडा आणि सनईच्या सुरात मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून देवाचा पालखी सोहळा गडकोटा बाहेर सीमोल्लंघणासाठी निघाला.

दरम्यान, कडेपठार मंदिरातील पालखी सोहळ्यानेही देवाच्या भेटीसाठी कूच केले. दोन्ही पालख्यांसमोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी संपूर्ण गाव या सोहळ्यात सामील झालं होतं. जेजूरीच्या मर्दानी दसर्‍यातील देव भेटीचा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविक जमले होते.

 दुर्गामातेच्या दर्शनाला पोचला वरुण धवन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 08:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...