S M L

'जेईई मेन्स'च्या परीक्षेत नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात पहिली

वृंदाने 321 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावलंय तर उदयपूर इथला कल्पित वीरवाल याने 360 पैकी 360 गुण मिळवत देशात सर्वप्रथम येण्याचा बहुमान आपल्या नावं केला आहे.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 28, 2017 11:26 AM IST

'जेईई मेन्स'च्या परीक्षेत नाशिकची वृंदा मुलींमध्ये देशात पहिली

28 एप्रिल : आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परिक्षेत नाशिकच्या वृंदा नंदकीमार राठी या विद्यार्थिनीने मुलींमध्ये देशात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

अभियंत्रिकीसाठी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून 13 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. वृंदाने 321 गुण मिळवत देशात अव्वल स्थान पटकावलंय तर उदयपूर इथला कल्पित वीरवाल याने 360 पैकी 360 गुण मिळवत देशात सर्वप्रथम येण्याचा बहुमान आपल्या नावं केला आहे.

वृंदा ही नाशिक रोड इथल्या सेंट झेविअर्स हायस्कूलची विद्यार्थीनी आहे. तिने दहावीत 94 टक्के गुण मिळवले होते. पंचवटी महाविद्यालयातून तिने बारावीची परीक्षा दिली आहे.'आयआयटीएन्स स्पेस' या अकॅडमीतून वृंदाने जेईईचा अभ्यास केला आहे. आयआयटीमधून संशोधन क्षेत्रात करियर करण्याची वृंदाची इच्छा आहे. तिचे वडील नंदकुमार राठी हे स्वत: प्रॉडक्शन इंजिनिअर आहेत.

देशातील अव्वल दर्जाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग संस्थेच्या प्रवेशासाठी जेईई मेन्स ही परीक्षा 2, 4 आणि 9 एप्रिलला घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधून दोन लाख विद्यार्थी एडलान्स आणि पात्र ठरले. ऑफलाइन परीक्षा एकूण 1 लाख 65 हजार 635 विद्यार्थ्यांनी तर ऑनलाइन परीक्षा 9 लाख 56 हजार 716 विद्यार्थ्यांनी दिली.

 

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 11:06 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close