S M L

जयकुमार रावल यांचा नवाब मलिकांवर अब्रुनुकसानीचा दावा, जमीन दलालीचा केला होता आरोप

धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा दिलाय.

Sachin Salve | Updated On: Jan 30, 2018 05:14 PM IST

जयकुमार रावल यांचा नवाब मलिकांवर अब्रुनुकसानीचा दावा, जमीन दलालीचा केला होता आरोप

30 जानेवारी : धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोन दिवसांपूर्वी उपचारादरम्यान धर्मा पाटील यांचं निधन झालं. धर्मा पाटील यांच्या निधनावर

प्रतिक्रिया देताना, नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर जमिनीच्या दलालीचा आरोप केला होता. त्यांच्या विधानानंतर जयकुमार रावल यांनी नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.  धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा न्यायालयात रावल यांनी दाखल केला आहे.


 

काय म्हणाले होते नवाब मलिक ?

Loading...
Loading...

"धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून हत्या आहे. या हत्येला जयकुमार रावल जबाबदार आहे. जयकुमार रावल आणि कुटुंबिय त्यांच्या भागात एखादा प्रकल्प आला तर शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने खरेदी करायची आणि कोट्यवधीने त्यांचा मोबदला घ्यायचा हा रावल यांचा आधीपासूनचा उद्योग आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 30, 2018 05:14 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close