11 वर्षानंतर जायकवाडी धरणं 88 टक्के भरलं;लवकरच पाणी सोडण्याची शक्यता

11 वर्षानंतर जायकवाडी धरणं 88 टक्के भरलं;लवकरच पाणी सोडण्याची शक्यता

येत्या 48 तासात एकदा जरी जोरदार पाऊस झाला तर धरणातून पाणी सोडावं लागेल.

  • Share this:

19 सप्टेंबर: जायकवाडी धरण तब्बल 10 वर्षांनंतर 88 टक्के भरलं असून धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची तयारी प्रशासनाने करुन ठेवली आहे.यामुळे यावर्षी मराठवाड्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात  दिलासा मिळणार आहे.

आज 5 हजार क्यूसेक्सने पाणी जायकवाडी धरणात दाखल होतं आहे. धरण मोठ्या क्षमतेने 11 वर्ष नंतर भरलं आहे. येत्या 48 तासात एकदा जरी जोरदार पाऊस झाला तर धरणातून पाणी सोडावं लागेल. धरणाखालील बंधाऱ्यांची दारं आधीच काढून ठेवलेली आहेत. आता पाटबंधारे विभाग येणाऱ्या पाण्यावर चोवीस तास नजर ठेवून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 09:04 AM IST

ताज्या बातम्या