S M L

बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्याची फेसबुक पोस्ट व्हायरल, उद्या घेणार मोठा निर्णय

बीड लोकसभेची निवडणूक ऐन रंगात असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुकवर 'लढा' अशी पोस्ट टाकून एकच खळबळ उडवून दिली आहे.

Updated On: Apr 4, 2019 07:30 PM IST

बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्याची फेसबुक पोस्ट व्हायरल, उद्या घेणार मोठा निर्णय

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 04 एप्रिल : बीड लोकसभेची निवडणूक ऐन रंगात असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुकवर 'लढा' अशी पोस्ट टाकून एकच खळबळ उडवून दिली आहे. उद्या शुक्रवारी क्षीरसागर कुंटुंबाच्या संपर्कातील प्रमुख आणि विश्वासू कार्यकर्त्यांची बैठक होणार असून या बैठकीत निर्णायक भूमिका घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर घराणे म्हणून माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. स्थायिक सत्ता केंद्रे,नगरपरिषद, विद्यमान आमदार, कै.स्व केसरकाकू क्षीरसागर या तीन वेळा खासदार होत्या. याच बरोबर ओबीसी समाजात मोठा संपर्क असलेले जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीमधील परिणामकारक नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी मधील अंतर्गत नाराजीमुळे उघड उघड बंडाची भूमिका पुतणे संदीप क्षीरसागर यांनी घेतली होती. आज त्यांनाच राष्ट्रवादीमधील विरोधी पक्ष नेते हे स्थनिक नेते पुढे करत आहेत. त्यामुळे क्षीरसागर नाराज आहेत.


तर पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही विश्वासात घेतले जात नाही. वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर पक्षात अण्णांनी का राहावं? असा सवाल जवळचे कार्यकर्ते बोलून दाखवतं आहेत.

दरम्यान, क्षीरसागर कुटुंबांतील गृहकलह शिगेला पोहचला आहे. पुतणे संदीप यांना राष्ट्रवादीकडून पाठबळ मिळत असल्यानं जयदत्त क्षीरसागर पक्षावर नाराज होते. राष्ट्रवादी चा उमेदवार ठरवण्यापासून ते उमेदवारी जाहीर करून अर्ज दाखल करेपर्यंत ते बाजूलाच आहेत. क्षीरसागर यांनी उद्या व्यापक कार्यकर्ता बैठकीचे आयोजन आशीर्वाद लॉन्स येथे केले आहे. या बैठकीत क्षीरसागर हे राष्ट्रवादीसोबत राहणार की कोणाला साथ देणार हे जाहीर करणार आहे. त्यामुळे त्यांच्या अंतिम निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

भाजपशी वाढली जवळीक

Loading...

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीमध्ये नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांच्या मनमानी कारभाराबद्दल उघड उघड पक्ष नेतृत्वावर नाराजी जयदत्त क्षीरसागर यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली होती. तसंच भाजपच्या जाहीर कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली होती. एवढंच नाहीतर निवडणुकीच्या अगोदर नगर परिषदेच्या उद्घाटनाला थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना आणून कार्यक्रम घेतला होता. यातच निवडणुकीच्या रणधुमाळीत क्षीरसागर कुंटुंबाच्या संपर्कातील प्रमुख आणि विश्वासू कार्यकर्त्यांची बैठक बीडमध्ये होणार असून यात क्षीरसागर निर्णायक भूमिका घेणार असल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडली आहे.

==================================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: beedNCP
First Published: Apr 4, 2019 07:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

Vote responsibly as each vote
counts and makes a difference

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close