Elec-widget

'उद्धव ठाकरे दुपारी भाजपला शिव्या देतात आणि रात्री नाक घासत मुख्यमंत्र्यांना भेटतात'

'उद्धव ठाकरे दुपारी भाजपला शिव्या देतात आणि रात्री नाक घासत मुख्यमंत्र्यांना भेटतात'

'भाजपच्या विरोधात दुपारी शिव्या घालायच्या आणि नाक घासत रात्री मुख्यमंत्र्यांना भेटायचं, हे बंद करा,' अस म्हणत जयंत पाटील यांनी शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचं म्हटलं.

  • Share this:

रायगड, 10 जानेवारी : 'उद्धव ठाकरे यांनी दुपारी मोदींविरोधात भाषण केले आणि रात्री सोफिटेल हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर नाक घासत गेले,' अशा तिखट शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

'भाजपच्या विरोधात दुपारी शिव्या घालायच्या आणि नाक घासत रात्री मुख्यमंत्र्यांना भेटायचं, हे बंद करा,' अस म्हणत जयंत पाटील यांनी शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचं म्हटलं. राष्ट्रवादीची सध्या परिवर्तन यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्येच जयंत पाटलांनी सत्ताधारी भाजप-सेनेला लक्ष्य केलं.

राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेत आज सकाळी राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पावर यांच्या उपस्थितीत महाडमधील चवदार तळे इथं जाहीर सभादेखील होणार आहे.

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेचा हा पहिला टप्पा असून रायगड, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. या सभांमधून राष्ट्रवादी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. केंद्रातील राफेल प्रकरण आणि राज्यातील दुष्काळाची स्थिती या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीचे नेते सरकारला धारेवर धरतील.

Loading...

'सरकारवरचा विश्वास उडाला म्हणून परिवर्तन गरजेचं'

या भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे, म्हणून परिवर्तन होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. या परिवर्तन यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे , सुनील तटकरे यासांरखे दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.


Special Report : शरद पवारांना पंतप्रधानपद खुणावतंय का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com