S M L

जायकवाडी धरण 99.56 टक्के भरलं

आज दुपारपर्यंत धरण पुर्णक्षमतेने 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणाची क्षमता 102 टिएमसी आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Sep 26, 2017 10:43 AM IST

जायकवाडी धरण 99.56 टक्के भरलं

पैठण,26 सप्टेंबर: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणचं जायकवाडी धरण आता 99.14 टक्के भरलं आहे. पाण्याची आवक कमी झाल्यामुळे  पाण्याचा विसर्गही थांबवण्यात आला आहे.

नाशिक, अहमदनगर भागात झालेल्या भरपूर पावसामुळे जायकवाडी धरणात भरपूर पाणीसाठा जमा झाला होता. धरण 88 टक्के भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यानंतर धरणातील पाण्याचा विसर्ग होत असतानाही पाऊस पडत असल्याने पाणीसाठा अधिक वाढला. अनेक वर्षांनंतर धरण 100 टक्के भरण्याची चिन्हं दिसत आहेत. आज दुपारपर्यंत धरण पुर्णक्षमतेने 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. धरणाची क्षमता 102 टिएमसी आहे. धरणात पाणीसाठा समाधानकारक झाल्यानं रब्बीच्या पिकांना आणि पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे.

यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.यावर्षी पाण्याचा मराठवाड्यातला प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 26, 2017 10:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close