03 जून : हा शेतकरी संप मिटवण्यात अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका मानली जातेय. प्रारंभीपासूनच ते सरकारशी बोलणी करत होते. त्यामुळे सरकारकडून जयाजींना काही आश्वासन मिळालंय का याचीही चर्चा आता सुरू झालीय.
कोण आहेत जयाजी सूर्यवंशी ?
-शिक्षण - एम. ए.
-मूळगाव - गुरूपिंपरी, ता. कर्जत
-पैठण तालुक्यातल्या अमरोली वाघोली गावात 32 एकर शेती
-जयाजी हे अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष
-प्रारंभीच्या काळात राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते
-पण उमेदवारी न मिळाल्याने आपमध्ये प्रवेश
-'आप'कडून विधानसभेची उमेदवारी नाकाराली
-मागील विधानसभेत नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
-आरएएसच्या देवगिरी प्रांत मेळाव्यात हजेरी लावली
-जयाजींच्या सासरची सर्व मंडळी भाजपशी संबंधीत
-तरीही भाजपकडून विधानसभेची उमेदवारी नाहीच
-राजकारणात जम न बसल्याने शेतकरी आंदोलनात उडी
-अन्नदाता संघटनेच्या नावाने अनेक आंदोलनं केली
-जयाजी सध्या सदाभाऊ खोत यांचे निकटवर्तीय
-पुणतांबा शेतकरी संपातही सक्रीय सहभाग
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा