परभणीतील जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील हे पुरातन जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गोदावरी नदीच्या अगदी मधोमध वसलेलं हे छोटंसं बेट. या बेटावर निसर्गाच्या अद्भूत अविष्काराचा अनुभव येतो

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 19, 2017 01:00 PM IST

परभणीतील जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर

परभणी,19 ऑक्टोबर: महाराष्ट्रात नैसर्गिक साधन संपत्ती अमाप आहे. ज्या जतन न केल्याने त्यांचा ऱ्हास होतोय. अशीच परभणी जिल्ह्यातील एक दुर्लक्षित झालेली निसर्गाची भेट म्हणजे जांभूळ बेट. पण याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे

मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील हे पुरातन जांभूळ बेट नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गोदावरी नदीच्या अगदी मधोमध वसलेलं हे छोटंसं बेट. या बेटावर निसर्गाच्या अद्भूत अविष्काराचा अनुभव येतो. एकेकाळी हे बेट राज्यभरातील पर्यटकांनी गजबजलं असायचं. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे नावाजलेलं पुरातन बेट आज शेवटच्या घटका मोजतंय.

निसर्गाने वेढलेल्या या जांभूळ बेटावर अगदी मध्यभागी पुरातन मारुती मंदिर आहे. परिसरात जांभळाच्या झाडांची गर्दी. मोरांचे थवे आणि इतर पशुपक्षांची वर्दळ पुर्वी या ठिकाणी होती. मात्र नदीपात्रातून होणारा वाळू उपसा, आवश्यक सुविधांचा अभाव, बेटाची योग्य निगा न राखण्यात आल्यानं बेटाची झीज होऊन क्षेत्रफळ कमी होत चाललंय. त्यामुळे पर्यटक आणि पशुपक्षी इथं येणं कमी झालंय.

एकूणच निसर्गाने दिलेल्या या जांभूळ बेटाकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज निर्माण झालीय. नाही तर काही दिवसांनी परभणीत जांभूळ बेट होत अशीच या परिसराची भविष्यातली ओळख असेल.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close