मराठा आरक्षण आंदोलन : तरूणाने गोदावरीत टाकली उडी, थोडक्यात वाचला जीव

एका तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. नंतर त्या तरूणाला शोधण्यात यश मिळालं.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2018 04:24 PM IST

मराठा आरक्षण आंदोलन : तरूणाने गोदावरीत टाकली उडी, थोडक्यात वाचला जीव

औरंगाबाद, 23 जुलै : औरंगाबादमध्येही मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन केलं आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरी नदीत अर्पण केली आहे. या वेळी अपघात घडला एका तरूणाने नदीतच उडी घेतली. प्रवाहाचा वेग जास्त असल्याने तो त्यात वाहून गेला. नंतर त्या तरूणाला शोधण्यात यश मिळालं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कायगाव टोक येथीस गोदावरी नदीकाठावर त्यांनी हे आंदोलन केलं आहे. कायगाव टोक परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.

मराठा मोर्चेकरांचं टोकाचं पाऊल, मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक तिरडी गोदावरीत सोडली

औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरांची 'जलसमाधी'

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजाने अनेक शांतीपूर्ण मार्गाने मूक मोर्चे काढून मराठा आरक्षणासाठी सरकार कडे शांततेच्या मार्गाने आरक्षणाची मागणी केली होती. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करून मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार कडून होत असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावर आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे.

हाच आहे नरेंद्र मोदींचा क्रूर 'न्यू इंडिया', राहुल गांधींचा ट्विटरवरून हल्लाबोल

Loading...

दीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

तर दुसरीकडे परभणीतही मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पेटवलं आहे. गंगाखेडमध्ये 4 खासगी गाड्या, 5 बसेस, पोलिसांची व्हॅन आणि एक बस जाळण्यात आली आहे. या आंदोलनामुळे गंगाखेड परिसराला दंगलीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे गंगाखेड बंदची हाक हिसंक वळणार नेण्यात आली असंच म्हणावं लागेल.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2018 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...