जळगावात संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड

जळगावात संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड

प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून हॉस्पिटलची तोडफोड

  • Share this:

30 मार्च : राज्यभरात डॉक्टरांवरच्या हल्ल्यांचं सत्र अद्यापही सुरूच असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जळगावमध्ये प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाईकांनी मेहरुण परिसरातील ममता हॉस्पिटलची तोडफोड केली. इतकंच नाही तर चारचाकी गाड्यांच्या काचा आणि रुग्णालयाच्या रिसेप्शनचीही मोडतोड करण्यात आली. यामुळे हॉस्पिटलचं मोठं नुकसान झालं आहे.

ममता रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी या महिलेला दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रसूतीदरम्यान तिचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी हॉस्पिटलची मोडतोड केली.

दरम्यान, या घटने नंतर डॉक्टरांमध्ये  भीतीचे  वातावरण पसरले आहे. डॉक्टारांवरील होणारे हल्ले याविरोधात मागील काही दिवस राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर होते. हॉस्पिटलत सुरक्षा रक्षक आणि इतर सोयी देण्याचं सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर डॉक्टरांनी हा संप मागे घेतला होता.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 30, 2017 10:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...