जळगाव सिमी खटल्यातील आरोपींना 10 वर्षांची सक्तमजुरी

दोघांना न्यायालयाने कलम १२० ब नुसार दहा वर्षांची सक्त मजुरी आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2017 07:39 PM IST

जळगाव सिमी खटल्यातील आरोपींना 10 वर्षांची सक्तमजुरी

01 एप्रिल : जळगाव सिमी खटल्याचा अंतिम निकाल आज (01 एप्रिल) लागलाय.  या प्रकरणातील दोषींना दहा वर्षांची सक्त मजुरी आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

देशविघातक कृत्यात सहभाग असल्याच्या संशयावरून या दोघांना 2001 साली अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. हे दोघेही सध्या बंदी घातण्यात आलेल्या सिमी या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. परवेझ खान आणि आसिफ खान या दोघांना काल देशविरोधात कट रचल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं.

या खटल्यात देशविघातक कृत्यात सहभाग घेतल्याबद्दल सिमी संघटनेच्या दोन सदस्यांना आज शिक्षा सुनावण्यात आली. काल जिल्हा न्यायालयाने या दोघांना दोषी ठरवलं होतं.

आज या दोघांना न्यायालयाने कलम १२० ब नुसार दहा वर्षांची सक्त मजुरी आणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आलीय. शिक्षा सुनावल्यावर परवेज खान याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलीय. तर आसिफ खान याच्यावर यापूर्वीच मुंबई लोकल बॉम्बस्फोट खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून तो पुण्याच्या येरवडा तुरूंगात शिक्षा भोगतोय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...