खान्देशातील शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा!

खान्देशात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी जळगावसर बहुतांश जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2018 11:06 PM IST

खान्देशातील शेतकऱ्यांना आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा!

जळगाव, 4 ऑगस्ट : खान्देशात काही प्रमाणात पाऊस झाला असला तरी जळगावसर बहुतांश जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पिके धोक्यात आली आहेत. नदी, नाले, विहिरी, शेततळी कोरडी असून, शेतकऱ्यांचे डोळे आता परतीच्या पावसाकडे लागले आहेत.

मागील वर्षी बोंड अळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, यंदा या पावसाअभावी शेतकऱ्यांच्या कापशीसह इतर पीक धोक्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील शिंदी या गावाचे भौगोलिक क्षेत्र १६२६ हेक्टर असून, त्यापैकी ९५० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. ६३६ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये ११५ हेक्टर बागायती असून, उर्वरित कोरडवाहू क्षेत्रात अन्य पिकांचीही लागवड करण्यात आली आहे. सर्वाधिक लागवड कपाशीची झाली असून, पुरेसा पाऊस न झाल्याने कपाशीसह इतर पिकेही धोक्यात आली आहेत.

या गावात ११५ हेक्टर बागायती क्षेत्र आहे त्यामुळे या बागाईत पिकावर याचा परिणाम फारसा आढळून येत नाहीये. मात्र, या पावसाअभावी गावातील कोरडवाहू क्षेत्रातील कपाशी पीक धोक्यात आले आहेत. पाऊस नसल्यामुळे या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडी, पांढरी माशी यांचा काही प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम अन्य पिकांवरदेखील होत आहे. कृषी विभागाकडूनही याची पाहणी करत वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पावसाअभावी या गावातील विहिरी, नदी, नाले कोरडे झाले आहे , एवढेच नाहीतर शासनामार्फत तयार करण्यात आलेले आठ शेततळे ते देखील कोरडेच आहेत. त्यामुळे या परिसरातील पिके धोक्यात आली असून परतीचा पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना पुढे एक नवीन संकट उभे राहणार आहेत.

 VIDEO : अकोला जिल्हाधिकाऱ्यांची 'मुन्ना भाई' स्टाईल गांधीगिरी!

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2018 11:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...