अघोरी सासुरवास;पैशासाठी पतीने पत्नीची जीभ कापली, मुलीलाही पाण्यात बुडवलं

माहेरून पाच लाख रुपये आणि दहा तोळे सोन आणावं म्हणून पत्नीची अमानुष मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2018 10:02 PM IST

अघोरी सासुरवास;पैशासाठी पतीने पत्नीची जीभ कापली, मुलीलाही पाण्यात बुडवलं

जळगाव,10 जुलै : माहेरून पाच लाख रुपये आणि दहा तोळे सोन आणावं म्हणून पत्नीची अमानुष मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उर्मिला तुषार अमृतकर या विवाहितेला तिच्या पतीने आणि सासरच्यांनी पट्टा दांडुका याने बेदम मारहाण केली आहे. इतकंच नाही तर जिभे मध्ये चाकू खुपसून तिची जीभ कापण्याचा अघोरी प्रयत्न तिच्या पतीने केलेला आहे. परिसरातील नागरिक आणि तिचे चुलत सासरे यांनी तिला तिच्या पतीपासून वाचवून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेले आहेत.

देशात सर्वत्र महिला सबलीकरणाचा शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र असे असताना महिला स्वतःच्याच घरात सुरक्षित नाहीये हे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयांमध्ये उर्मिला तुषार अमृतकर या विवाहितेला उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेच्या पतीने तिला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप उर्मिला तुषार अमृतकर या महिलेने केलेला आहे.

VIDEO : दुर्दैवी!,आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून पोस्टमाॅर्टमसाठी घेऊन गेला

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात गोंडगाव या ठिकाणी शेती व्यवसाय करणारा तिचा पती तुषार अमृतकर याने तिची फसवणूक करून चौथे लग्न केले. माहेरून पाच लाख रुपये आणि दहा तोळे सोनं आणावे या मागणीसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक अतोनात छळ तुषारने सुरू केला होता तुषारची आई बहीण आणि भाऊ हेदेखील या छळामध्ये सहभागी होते अशी माहिती या पीडित महिलेने दिली.

तावडे साहेब जरा इकडे लक्ष द्या - विद्यार्थी करताहेत जीवघेणा प्रवास!

इतकंच नाही तर तिच्या एक वर्षाची मुलाला देखिल पाण्यात बुडवून मारून टाकण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याची माहिती उर्मिलाने दिलेली आहे, आज तिच्या पतीने तिला पट्ट्याने आणि दांडक्याने बेदम अशी मारहाण केली. त्यामुळे तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा सुद्धा झाल्यात.  या निर्दयी आणि क्रूर पतीने तिच्या जिभेमध्ये धारदार चाकू खुपसून तिची जीभ फाडण्याचा प्रयत्न केला. तिच्या तोंडावर उशी दाबून तिला मारण्याचा देखील प्रयत्न केला.

मोहिम फत्ते! थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका

गेल्या अनेक दिवसांपासून उर्मिलाला उपाशी ठेवण्यात आले होते स्वयंपाक घराला कुलूप लावून तिला उपाशी ठेवले जात असे अशी माहिती तिने दिली. हुंड्यासाठी लातूरच्या माहेरवाशिणीचे सासरच्यांनी अतोनात छळ केला. आज ज्या वेळी उर्मिलाला मारहाण झाली त्यावेळेस तिच्या चुलत सासऱ्याने तिला पतीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र या राक्षसी पतीने त्यांनादेखील मारहाण केली. उर्मिलाचे चुलत सासरे आणि परिसरातील नागरिकांनी तिला पतीच्या तावडीतून सोडवत आता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या सर्व घटनेवरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आज देखील ऐरणीवर असल्याचे चित्र समोर आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close