S M L

अंजली दमानियांसह 6 जणांविरुद्ध 420 चा गुन्हा दाखल

न्यायालयाने सदर प्रकरणात २४ तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावर आज दुपारी साडेअकरा वाजता मुक्ताईनागर पोलिसात

Sachin Salve | Updated On: Jun 13, 2018 11:39 PM IST

अंजली दमानियांसह 6 जणांविरुद्ध 420 चा गुन्हा दाखल

जळगाव,13 जून : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या विरुद्ध बनावट कागदपत्रं तयार करून कट रचणे, दस्तावेज चोरी करणे आणि फसवणुकीबाबत रचल्या प्रकरणी अंजली दमानियासह ६ जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

महिन्याभरापूर्वी याबाबत मुक्ताईनगर पोलिसांसह जिल्हा पोलिस अधिक्षकांना तक्रार देऊनही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने खडसेंनी या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. मंगळवारी मुक्ताईनगर प्रथम वर्ग न्यायालयात या बाबत तीन तास युक्तिवाद झाला. यावर न्यायालयाने सदर प्रकरणात २४ तासाच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यावर आज दुपारी साडेअकरा वाजता मुक्ताईनागर पोलिसात स्वतः खडसे यांनी न्यायालयाचे आदेश सादर करून दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा क्रमांक 116 भादवी कलम  379,380,420,465,466,467,468,469,471,474,120ब आणि श कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मलपुरे, सुभाष परशुराम कुऱ्हाटे,सदाशिव व्यंकट सुब्रमन्याम, चारमेन फनर्स या  ६ जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे.

यापूर्वी अंजली दमानिया विरुद्ध 19 एप्रिल रोजी कल्पना इनामदार यांनी अंजली दमानिया यांनी खडसे यांच्याविरुद्ध कट रचल्याच्या वक्तव्य आधारे गुन्हा दाखल केला होता.

संबंधीत बातम्या

Loading...

खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी

एकनाथ खडसे बदनामी प्रकरणी अंजली दमानियांना जामीन

कल्पना इनामदार यांच्यामागे एकनाथ खडसेंचा हात - अंजली दमानिया

हेही वाचा

पिंपरीत कठुआ!, 8 वर्षांच्या चिमुरडीवर मंदिरात बलात्कार

चार बेडरुम, 16 कोटी किंमत!, असा आहे दीपिकाचा 'बो मोंड'मधला फ्लॅट

कोण आहे विनायक, जो सांभाळणार भय्यूजी महाराज यांची संपूर्ण संपत्ती !

पती, पत्नीने दीड वर्षाच्या मुलीसह विष पिऊन घेतली फाशी

अखेर ललिता झाली ललित !

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 13, 2018 07:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close