Jalgaon Election 2018: उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड !

Jalgaon Election 2018:  उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड !

निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय.

  • Share this:

जळगाव, 03 आॅगस्ट : जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री आणि यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिलाय. महाजनांच्या या विजयामुळे खडसेंची अस्वस्था वाढलीये.

जळगाव महापालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने 57 जागांवर निर्विवाद आघाडी घेतली आहे. भाजप सत्ता स्थापन करणार हे जवळपास या निकालावरून स्पष्ट झालंय. या निकालामुळे जळगावातील सुरेश जैनांचं राजकीय साम्राज्य एकाच दणक्यात खालसा झालंय. या निवडणुकीत सुरेश जैनांनी प्रथमच आघाडीचा सवतासुभा बाजुला ठेऊन शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुका लढल्या तरीही तरीही त्याचा त्यांना काहीच राजकीय फायदा झाला नाही. बरेच दिवस जेलमध्ये राहिल्याने त्यांना जळगावकरांची सहानुभूती मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण झालं उलटचं, गिरीश महाजनांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन प्रथमच महापालिकेची सत्ता काबीज केल्याच जमा आहे.

जळगाव महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्या पासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनात खडसे हे या निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे पाहायला मिळाले होते,अधिवेशन आणि मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणूक कारणामुळे ते दूर असल्याचं सांगितलं जात होतं मात्र अगोदरच जिल्ह्यात गिरीश महाजन आणि खडसे असे सरळ सरळ दोन गट भाजपमध्ये दिसून येत असल्याने विविध तर्क विर्तक यामुळे लावले जात होते. पण तरीही भाजपचे नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या प्रचार कार्यात खडसे सहभागी झाले होते. त्यांनी पालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असा दावा केला होता.  एवढंच नाहीतर या निवडणुकीत खडसेंच्या आवाजात एक आॅडिओ क्लिप प्रसिद्ध करण्यात आली होती. पण महाजनांना एकटं पाडण्यासाठी 'ती' ऑडिओ क्लीप आपली नसल्याचेच सांगून मोठी खळबळ उडवून दिली होती. तरीपण त्याचा भाजपच्या मतदानावर काहीच परिणाम दिसून आला नाही.

विशेष म्हणजे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद सर्वश्रूत आहे. खडसेंना भूखंड घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांचं कौतुक करत उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकाप्रकारे महाजनांवर सोपवली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या खडसेंनी अनेक वेळा आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.

दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीसाठी 75 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने सर्वाधिक 57 जागांवर आघाडी घेऊन बहुमताकडे वाटचाल सुरू केलीय. मात्र, मागील निवडणुकीत चौथ्या स्थानावर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांने प्रचाराकडे पाठ फिरवली होती. याचाच फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला.

हेही वाचा

Jalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य

Jalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग

 Jalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ

 Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्का

LIVE : सांगलीच्या निकालात टि्वस्ट, काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपची आघाडी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2018 01:42 PM IST

ताज्या बातम्या