S M L

एकनाथ खडसेंनी गड राखला,जळगाव नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

नगराध्यक्ष पदासह एकूण नगरसेवकाच्या १७ जागांपैकी १३ जागेवर वर्चस्व मिळवून मुक्ताईनगर नगरपंचातीवर भाजपने सत्ता मिळविली

Updated On: Jul 20, 2018 07:32 PM IST

एकनाथ खडसेंनी गड राखला,जळगाव नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

जळगाव, 20 जुलै : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदासह एकूण नगरसेवकाच्या १७ जागांपैकी १३ जागेवर वर्चस्व मिळवून मुक्ताईनगर नगरपंचातीवर भाजपने सत्ता मिळविली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपला गड कायम राखलाय.

VIDEO : कर्जमाफीच्या नियमांमध्ये बदल, पाच लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवकांच्या जागेसाठी निवडणूक घेण्यात अली होती या निवडणुकीत एकूण ७२ नगरसेवक रिंगणात होते या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून एकूण १७ पैकी १३ जागेवर भाजपने विजय मिळवला आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी देखील भाजपच्या नजमा तडवी यांची निवड झालीय. यावेळी निवडणुकीचा निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

राहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक : 'गळा भेट' आणि 'डोळा भेट'

या नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी भाजपला १३, शिवसेनेला ३ तर अपक्ष १ जागा मिळालीय. मात्र याठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खाते उघडले नाही. मुक्ताईनगर हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा मतदार संघ आहे तर या मतरदार संघात भाजपने सत्ता मिळवल्यामुळे आता मुक्ताईनगर नगर पंचायत खडसेंच्या ताब्यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 20, 2018 07:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close