जळगावात पहिल्यांदाच महापौरपद भाजपकडे, सीमा भोळे होणार विराजमान

जळगावात पहिल्यांदाच महापौरपद भाजपकडे, सीमा भोळे होणार विराजमान

मनपाच्या महापौरपदी भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची निवड निश्चित झाली आहे.

  • Share this:

जळगाव, 18 सप्टेंबर : जळगाव मनपाच्या महापौरपदी भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची निवड निश्चित झाली आहे. तर उपमहापौर पदी भाजपाचे डॉ. अश्विन सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेने तर्फ़े महापौर पदासाठी जयश्री महाजन आणि उप महापौर पदासाठी प्रशांत नाईक यांचाही अर्ज देण्यात आला आहे. त्यावरही आज औपचारिक घोषणा होणार आहे.

महापालिकेची निवडणूक गेल्या महिन्यात पार पडली. मात्र मागील नगरसेवकांची मुदत 20 सप्टेबरपर्यंत कायम होती. त्यामुळे तब्बल दीड महिन्यानंतर महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया घेण्यात येत आहे. निवडणुकीत 75 जागापैकी भारतीय जनता पक्षाला 57 तर शिवसेनेला 15, एमआयएमला 3 जागा मिळाल्या आहेत.

तब्बल 35 वर्षे महापालिकेवर सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. भाजपला प्रथमच भक्कम बहुमत मिळाले आहे.

सीमा भोळे यांनाची महापौरपदी निवड

भाजपाकडून आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांची निवड झाली आहे. त्यांनी ओबीसी महिला राखीव प्रभाग ७ अ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या हेमलता डी.वाणी यांचे तगडे आव्हान होते.

तर खाविआमधून भाजपामध्ये गेलेल्या माजी उपमहापौर भारती सोनवणे यांनी देखील ओबीसी महिला राखीव प्रभाग ४ ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासह सिंधुताई कोल्हे यांना देखील महापौरपदाची संधी भाजपाकडून होती. पण या सगळ्यावर विजय मिळवत सीमा भोळे या महापौरपदी असणार आहेत.

 

PHOTOS : या अॅपद्वारे मिळवा शंभरचं पेट्रोल ६० रुपयात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2018 12:39 PM IST

ताज्या बातम्या