चंद्रकांत पाटलांनी कर्नाटकात जावून राहावं -अजित पवार

चंद्रकांत पाटलांनी कर्नाटकात जावून राहावं -अजित पवार

"कर्नाटकात काय बरळला गडी कळलंच नाही. खुशाल कर्नाटकाच गुनगाण गातात"

  • Share this:

24 जानेवारी : ज्यांना आपल्या महाराष्ट्राचा अभिमान नाहीये असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा देऊन कर्नाटकात जावे असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला. ते जालना जिल्ह्यातील जाफराबाद इथ आयोजित हल्ला बोल यात्रेनंतर आयोजीत सभेत बोलत होते.

राष्ट्रवादीची हल्ला बोल यात्रा जालना जिल्ह्यात दाखल झाली. आज जाफराबाद इथ जाहीर सभेच आयोजन करण्यात आल होतं. यावेळी अजित पवार यांनी राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले की, कर्नाटकात काय बरळला गडी कळलंच नाही. खुशाल कर्नाटकाच गुनगाण गातात. आम्ही कोल्हापुर, पश्चिम महाराष्ट्राची लोक कारवार बेळगावसहीत गाव संपुर्ण महाराष्ट्रात पाहिजे यासाठी आंदोलन केलीत. बेळगावच्या महापौरपदी मराठी माणूस निवडून येतो. कर्नाटक सरकारने मराठी माणसाच्या शाळा बंद केल्या..जेलमध्ये घालतात..त्रास देतात.. डिवचतात आणि तिथ जावून चंद्रकांतदादा पाटील यांनी खुशाल सांगताहेत कर्नाटकात जन्माला यायला पाहिजे. अशा मंत्र्याने  राजीनामा द्यावा आणि कर्नाटकात जावून राहावे अशी टीका अजित पवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2018 10:16 PM IST

ताज्या बातम्या