भाजपला मतदान करण्यास सांगितलं, ही चूक झाली -राजू शेट्टी

भाजपला मतदान करण्यास सांगितलं, ही चूक झाली -राजू शेट्टी

भाजपला मतदान करा असं मी सुद्धा लोकांना सांगितलंय. पण आता आपल्याला फसवलं गेलंय, गंडवलं गेलंय ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची भावना आहे. यात मीसुद्धा आहे ही माझी चूक आहे

  • Share this:

29 मे : भाजपला मतदान करा असं मी सुद्धा लोकांना सांगितलंय. पण आता आपल्याला फसवलं गेलंय, गंडवलं गेलंय ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची भावना आहे. यात मीसुद्धा आहे ही माझी चूक आहे अशी कबुलीच भाजपच्या घटकपक्षात असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीये.

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत..स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन शिलेदार..एकजण आज पायी चालत आत्मक्लेश यात्रा करत होता. तर दुसरा शिलेदार इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत व्यासपीठावर बोलत होता. एकीकडे राजू शेट्टी सरकारला फैलावर घेत होते. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळत होते. तर या सरकारमधल्या लोकांना  मतदान करायला सांगितलं, ही घोडचूक झाली असं राजू शेट्टींनी आपल्या आत्मक्लेश यात्रेदरम्यान म्हटलं.  भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं मी सुद्धा लोकांना सांगितलंय. पण आता आपल्याला फसवलं गेलंय, गंडवलं गेलंय ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची भावना आहे. आता मी लोकांना मतदान करण्याचं सांगितलं यात मीसुद्धा होता. त्यामुळे लोकांना मतदान करा असं सांगितलं हा माझा दोष आहे असं राजू शेट्टी म्हणाले.

तर दुसरीकडे काही जण अकारण मुख्यमंत्र्यांवर टीका करतायेत, असं बोलत सदाभाऊंनी अप्रत्यक्षपणे राजू शेट्टींवर टीका केली.

काही लोकांना सदाभाऊ शत्रू आहे असं वाटतंय. पण मी तसा नाहीये. मी मित्रत्वासाठी शत्रूत्व करणारा नाहीये. मित्रांवर जीव टाकणारा मी माणूस आहे. पण आमच्या अंगावर येत असाल तर विरोध करावाच लागणार आहे असंही सदाभाऊंनी ठणकावून सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2017 07:06 PM IST

ताज्या बातम्या