रायगड जिल्ह्यात हिवाळ्यात पाऊस; नागरिकांची तारांबळ

कर्जतमध्ये शेतकरी आणि वीटभट्टीवाल्यांची एकच धावपळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या भात झोडणी सुरू असताना रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने भात गोळा करण्यासाठी तारांबळ उडाली आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 20, 2017 11:40 AM IST

रायगड जिल्ह्यात हिवाळ्यात पाऊस; नागरिकांची तारांबळ

20 नोव्हेंबर: रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली आणि माथेरानमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ऐन हिवाळ्यात रायगड जिल्ह्यात तसेच नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे.

कर्जतमध्ये शेतकरी आणि वीटभट्टीवाल्यांची एकच धावपळ उडाली आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या भात झोडणी सुरू असताना रिमझिम पावसाला सुरुवात झाल्याने भात गोळा करण्यासाठी तारांबळ उडाली आहे. सकाळी ढगाळ वातावरण होते आणि अचानक पाऊस सुरू झाल्याने माथेरान मध्ये आधीच थंड वातावरणात गारवा आलाय. तर खोपोली परिसरात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे,त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहने जपून आणि सावकाश चालवावीत असं आवाहन अपघातग्रस्तांचा मदतीला या टीमने केले आहे

आज पहाटे ५:३० वाजता खेड मध्ये आणि परिसरात अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणी पावसाच्या हलक्या सरीला सुरवात झाली. काही वेळातच खेड शहरा सह, भरणे , लोटे , आणी खाडीपट्ट्यात मुसळधार पावसाला सुरवात झाली , सुमारे तासभर मुसळधार पावसाने झोडपुन काढले ,

आता पावसाने विश्रांती जरी घेतली असली तरी वातावरण ढगाळ आहे आणि अधूनमधून थंड वारा सुटलाय. अंबरनाथमध्येही पावसानं हजेरी लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close