बीडमध्ये पावसाची दमदार हजेरी

बीड शहरात चांगला पाऊस झाल्यानं बिंदूसरा नदीसह नाले, ओढे, तलाव भरून वाहायला लागलेत.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Sep 12, 2017 09:34 AM IST

बीडमध्ये पावसाची दमदार हजेरी

बीड,12 सप्टेंबर: जिल्ह्यात काल मध्यरात्री अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. गेल्या चोवीस तासात ग्रामीण भागासह बीड शहरात चांगला पाऊस झाल्यानं बिंदूसरा नदीसह नाले, ओढे, तलाव भरून वाहायला लागलेत.

बीड शहरात काल रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. शहरातील दगडी पूलाला रात्री पाणी लागलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव आणि मांजरा धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालीय. माजलगाव धरणात सरासरी पन्नास टक्के तर मांजरा धरणात 55% उपयुक्त पाणीसाठा आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2017 09:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...