विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता;शेतमालाला धोका

विदर्भ मराठवाड्यात अतिवृष्टीची शक्यता;शेतमालाला धोका

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागाच पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडतो आहे. या पावसामुळे काढणीला आलेली पिकं धोक्यात आलीयेत.

  • Share this:

19 ऑक्टोबर:  19 ते 22 ऑक्टोबरदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस पडण्ची शक्यता नागपूरच्या हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे सुगीचे पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागाच पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडतो आहे. या पावसामुळे काढणीला आलेली पिकं धोक्यात आलीयेत. शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन पीक काढणीचं नियोजन करावं, किंवा काढलेली पिकं पावसापासून सुरक्षित राहतील अशी खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी खात्यानं केलंय.

यंदा अनेक वर्षानंतर चांगल्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जायकवाडीचं धरण पूर्ण भरलं आहे. विदर्भातही समाधानकारक पाणीसाठा आहे.त्यामुळे आता  पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 04:38 PM IST

ताज्या बातम्या